जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी एमपॉक्सच्या उद्रेकाला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.  (Image source- WHO)
आंतरराष्ट्रीय

आफ्रिकेत mpox चा उद्रेक! WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आफ्रिकेतील १३ देशांत एमपॉक्सच्या (mpox outbreak) व्हायरल संसर्गामुळे चिंता वाढली आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील एमपॉक्स या व्हायरल संसर्गाच्या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक शेजारच्या देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी एमपॉक्सच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांत दुसऱ्यांदा जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली..

ठळक मुद्दे

  • आफ्रिकेतील १३ देशांत एमपॉक्सच्या व्हायरल संसर्गामुळे चिंता वाढली.

  • WHO ने mpox प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतली आपत्कालीन बैठक.

  • एमपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित.

  • ९६ टक्क्यांहून अधिक प्रकरणे एकट्या काँगोमध्ये आढळली.

आफ्रिकेतील अनेक देशांत एमपॉक्सचा संसर्ग पसरला आहेत. यापैकी ९६ टक्क्यांहून अधिक प्रकरणे एकट्या काँगोमध्ये आढळून आली आहेत. याचदरम्यान, आता काँगोमधून Mpox च्या एका नवीन व्हेरिएंटचा फैलाव होऊ लागला आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ३-४ टक्के आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने काँगो आणि आफ्रिकन देशांमध्ये Mpox च्या उद्रेकाला आणीबाणी घोषित म्हणून घोषित केले आहे. गंभीर बाब म्हणजे, आफ्रिकन खंडात हा विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी कमी प्रमाणात लस उपलब्ध आहे.

१३ आफ्रिकन देशांमध्ये एमपॉक्सचा फैलाव

डब्ल्यूएचओने बुधवारी सांगितले की, १३ आफ्रिकन देशांमध्ये एमपॉक्सची प्रकरणे आढळली आहेत. त्याच्या नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. Mpox जवळच्या संपर्कातून पसरू शकतो. काही सौम्य दुर्मिळ प्रकरणात, तो जीवघेणा ठरतो. यात फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात.

एमपॉक्सचा उद्रेक, सर्वांच्या चिंतेची बाब

“आज, आपत्कालीन समितीची बैठक झाली आणि मला सल्ला देण्यात आला आहे की त्यांच्या मते, ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे. मी हा सल्ला मान्य केला आहे,” असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (WHO Director-General Dr Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, “ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या चिंतेची बाब आहे.

टेड्रोस पुढे म्हणाले, “जागतिक प्रतिसादात समन्वय साधण्यासाठी, प्रत्येक बाधित देशांशी जवळून काम करण्यासाठी आणि फैलाव रोखण्यासाठी, संक्रमित लोकांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचे जीव वाचवण्यासाठी WHO पुढील काही दिवस आणि आठवडे वचनबद्ध आहे.”.

mpox ची लक्षणे जाणून घ्या

  • Mpox जवळच्या संपर्कातून पसरू शकतो.

  • सामान्यतः सौम्य असताना, दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो.

  • फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात.

  • शरीरावर पुरळ उठतात.

यंदा १७ हजारांहून अधिक रुग्ण, ५१७ मृत्यू

या वर्षी आफ्रिकन खंडात आतापर्यंत १७ हजारांहून अधिक एमपॉक्सची संशयित प्रकरणे आढळून आली आहे. तर ५१७ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एमपॉक्स प्रकरणांमध्ये १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT