Bunker Buster Bomb x
आंतरराष्ट्रीय

Bunker Buster Bomb | अमेरिकेने इराणवर टाकलेला बंकर बस्टर बॉम्ब काय आहे? वजन 13,600 किलो, 60 मीटरपर्यंत विध्वंस क्षमता...

Bunker Buster Bomb | इराण हादरलं! गुप्त तळ, बंकर उद्वस्त, अमेरिकेकडून GBU-57 बॉम्बचा पहिल्यांदाचा वापर

Akshay Nirmale

US-Iran Bunker Buster Bomb

तेहरान/वॉशिंग्टन : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या गुप्त अणुशक्ती प्रकल्पांवर थेट हल्ला चढवत जगाचे लक्ष वेधले आहे. अत्यंत उच्च-प्रभावी GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) ‘बंकर बस्टर’ बॉम्बचा वापर करून अमेरिकेने इराणच्या फार्दो, नाटांझ आणि इस्फाहान (Fordow, Natanz, Isfahan) या अणु केंद्रांना लक्ष्य केलं.

हा बॉम्ब इतका शक्तिशाली आहे की तो जमिनीखाली 60 मीटरपर्यंत प्रवेश करून स्फोट करू शकतो आणि याच शक्तीचा वापर करत अमेरिकेने Fordow केंद्र पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष नव्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

अमेरिकेचा इराणवर अभूतपूर्व हवाई हल्ला

अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुशक्ती केंद्रांवर अभूतपूर्व हवाई हल्ला केला आहे. Fordow, Natanz आणि Isfahan या अणु केंद्रांवर एकूण 12 GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) बॉम्ब आणि 30 Tomahawk क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.

अमेरिकेच्या या कारवाईत Fordow केंद्र पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Natanz वर 2 बॉम्ब इतर 30 Tomahawk मिसाइल्स Natanz आणि Isfahan येथे लॉंच करण्यात आले. हे बॉम्ब युद्धात पहिल्यांदा वापरले गेले आहेत, असे नोंदवले गेले .

GBU-57 म्हणजे काय? 

  1. GBU‑57A/B, ज्याला Massive Ordnance Penetrator (MOP) म्हणून ओळखले जाते, हे अमेरिकेचे सर्वात मोठे, नॉन–न्यूक्लियर पारंपरिक “bunker‑buster” बॉम्ब आहे.

  2. हे GPS-गाइडेड असून, खोलवर असलेली संरचना तोडण्यासाठी खास डिझाइन केलेले आहे

  3. याचे वजन तब्बल 13,600 किलो (30,000 पाउंड) आहे

  4. लांबी 20.5 f आणि व्यास सुमारे 31.5 इंच

  5. हा बॉम्ब 60 मीटर खोल भूगर्भात प्रवेश करून स्फोट घडवतो.

  6. ताकद: 6,000 lb (2.4 ट्न) उच्चस्फोटक वहन क्षमता जी 60 मीटर खोल जमिनीत किंवा 18 मीटर जाडीच्या काँक्रीटमध्ये प्रवेश करून विस्फोट करू शकतो

  7. या बॉम्बचे 2013 पर्यंत कमीत कमी 20 युनिट्स निर्मित; 2025 मध्यापर्यंत सुधारित आणि अपडेटेड व्हेरिएंट्स तयार केले गेले होते.

B-2 Spirit ने केली कारवाई

हे बॉम्ब फक्त B-2 Spirit या स्टेल्थ बॉम्बर्समध्येच बसवले जाऊ शकतात. अमेरिकेने 6 B-2 विमानांमधून 12 MOP बॉम्ब Fordow वर टाकले, तर Tomahawk क्षेपणास्त्रांचा वापर Natanz आणि Isfahan केंद्रांवर करण्यात आला. Northrop B‑2 Spirit ही एकमेव विमाने आहेत जी हे 30,000 lb ‘bunker‑buster’ बॉम्ब घेऊ शकतात

इराणच्या Fordow सारख्या आण्विक सुविधा केंद्रे 50 ते 100 मीटर खोलवर असल्यामुळे फक्त GBU‑57 सारखा बॉम्बच ती उद्धवस्त करू शकतो.

ट्रम्प म्हणतात- संपूर्णतः नष्ट...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला “spectacular military success” असे संबोधले आणि सांगितले की “Fordow केंद्र पूर्णतः नष्ट झाले आहे.इराण शांततेचा मार्ग स्वीकारत नसेल, तर अजून मोठी कारवाई होऊ शकते, असेही ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्यावर “गंभीर चिंता” व्यक्त केली असून, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. तज्ञांच्या मते हा हल्ला मध्य-पूर्वेतील आणखी एक युद्ध भडकवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT