US sanctions on RSS RAW: अमेरिकेची आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य समितीने (USCIRF) राष्ट्रीय स्वयम सेवक संघ तसेच भारताची गुप्तचर संघटना रिसर्च अँड अॅनलिसिस विंग अर्थात RAW वर टार्गेटेड सँक्शन लावण्याची शिफार केली आहे. या दोन संघटनांनी धार्मिक स्वातंत्र्य नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला जात आहे.
परराष्ट्र मंत्र्यालयानं या USCIRF च्या शिफारसीवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी देखील या समितीनं अशाच प्रकारच्या शिफासरी केल्या होत्या त्यावेळी परराष्ठ्र मंत्रालयानं हे तथ्यहीन आणि राजकीय दृष्टीकोणातून प्रेरीत असल्याचं सांगितलं होतं.
USCIRF ही समिती १९९८ मध्ये अमेरिकन काँग्रेसने याची निर्मिती केली होती. ही समिती जागतिक स्तरावरील धर्म स्वातंत्र्याबाबत घटनांवर लक्ष ठेवून असते. त्या आधारे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि अमेरिकन काँग्रेसला शिफारशी करत असतं. ही संस्था स्वतंत्रपणे काम करते असं सांगितलं ताजं. मात्र राष्ट्राध्यक्ष आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील वरिष्ठ राजकीय नेते या संघटनेतील नऊ संचालक निवडतात.
दरम्यान, USCIRF च्या वार्षिक अहवालात भारतातील धर्म स्वातंत्र्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यात भारतातील धर्म स्वातंत्र्याची स्थिती सातत्यानं ढासळत आहे. या अहवालात भारत सरकारवर अल्पसंख्यांकांना टार्गेट करत असल्याचा देखील आरोप करण्या तआला आहे.
अहवालात, 'देशातील अनेक राज्यांची सरकारे ही धर्म परिवर्तन विरोधी कायदे अजून कडक करत आहेत. ते कडक शिक्षेचा समावेश करत आहेत. याचबरोबर भारत सरकार देखील मोठ्या प्रमाणावर धार्मिक शरणार्थींविरूद्ध कारवाई करत असून त्यांची बेकायदेशीररित्या हकालपट्टी करत आहे. याचबरोबर कथित संरक्षक हे अल्पसंख्यांविरूद्ध हिंसाचार देखील करत आहेत. या अहवालात वक्फ अॅक्टचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.