इंग्‍लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump |प. आशियातील तणावादरम्यान अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प- इंग्‍लंडचे PM स्टार्मर आमने-सामने; नेमकं कारण काय?

Donald Trump slams UK PM Keir Starmer | दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump slams UK PM Keir Starmer

वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियात इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर संयुक्‍तपणे हल्‍ला केला. प्रत्युत्तरादाखल इराणनेही अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केले आहे. एकीकडे हा संघर्ष सुरु असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्‍लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात ठिणगी पडली आहे.

दोन्ही देशांच्या संबंधांत पहिल्यांदाच असा प्रकार : ट्रम्‍प

'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यासाठी ब्रिटनने 'डिआगो गार्सिया' एअरबेसचा वापर करण्यास मज्जाव केल्याबाबात आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले की, "इराणवर कारवाई करण्यासाठी डिआगो गार्सिया लष्करी तळाचा वापर करण्याची परवानगी नाकारल्यामुळे मी पंतप्रधान स्टार्मर यांच्यावर प्रचंड नाराज आहे. चागोस द्वीपसमूहातील या तळाचा वापर करण्यापासून अमेरिकन फौजांना सुरुवातीला रोखणे, हे दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या इतिहासात कधीही घडले नव्हते."

इंग्‍लंडच्‍या भूमिकेत बदल, पण ट्रम्प असमाधानी

आंतरराष्ट्रीय कायद्याचा हवाला देत इंग्‍लंडने सुरुवातीला डिआगो गार्सिया आणि 'आरएएफ फेयरफोर्ड' सारख्या तळांवरून हल्ले करण्यास नकार दिला होता. मात्र, रविवारी रात्री उशिरा स्टार्मर यांनी आपली भूमिका बदलली. केवळ 'विशिष्ट आणि मर्यादित संरक्षण उद्देशांसाठीच' या तळाचा वापर करू दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, "स्टार्मर यांनी हा निर्णय घेण्यास खूप उशीर केला. पंतप्रधानांना कदाचित याच्या कायदेशीर वैधतेची काळजी वाटत असावी, पण यामुळे मोहिमेत अडथळा निर्माण झाला."

स्टार्मर यांच्या एकूणच कार्यपद्धतीमुळे आम्ही निराश

डिआगो गार्सियावरून सुरू असलेल्या या वादामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिटनच्या वादग्रस्त 'चागोस करारा'तून पाठिंबा काढून घेतला आहे. या करारानुसार, हिंदी महासागरातील या क्षेत्राची मालकी मॉरिशसला सोपवून लष्करी तळ भाडेतत्त्वावर घेण्याची योजना होती. यावर ट्रम्प यांनी म्हटले की, "अचानक मॉरिशसने मालकी हक्काचा दावा सुरू केला. स्टार्मर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून हे बेट स्वतःकडेच ठेवायला हवे होते किंवा स्पष्टपणे सोपवायला हवे होते. कीर स्टार्मर यांच्या एकूणच कार्यपद्धतीमुळे आम्ही निराश आहोत."

इराणच्या मुद्द्यावरून इंग्‍लंडला सुनावले

इराणवरील अमेरिकन हल्ल्यांच्या दोन दिवसांनंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम नियोजित वेळेच्या खूप पुढे आहे. स्टार्मर यांनी सुरुवातीपासूनच सहकार्य करायला हवे होते. इराणवर आरोप करताना ट्रम्प म्हणाले, "इराण ब्रिटनच्या अनेक नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपले हात, पाय किंवा चेहरे गमावले आहेत. यातील ९५ टक्के प्रकरणांमागे इराणचा हात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT