Alyson Cranick case: अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यात एका 11 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 44 वर्षांच्या अॅलिसन क्रॅनिक नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. ती या प्रकरणात दोषीही ठरली आहे. तपासात उघड झाले की, आरोपी महिलेनं मुलाशी Snapchat आणि Discord वरून संपर्क साधला आणि त्याला उशिरा रात्री घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडले. तिने मुलाला जागं ठेवण्यासाठी त्याला कॅफिनयुक्त पेय दिल्याचेही कबूल केले आहे.
क्रॅनिकने मुलाला आकर्षित करण्यासाठी Apple AirPods आणि प्लास्टिक पेललेट्स फायर करणारी बंदूक देण्याचे आमिष दाखवले होते. पोलिसांनी सांगितले की, तिने मुलाला अनेक वेळा कारमध्ये फिरायला नेऊन किमान 14 वेळा त्याच्यावर अत्याचार केला.
2023 मध्ये मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणात क्रॅनिकवर औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला अटक झाली. जामिनावर बाहेर आल्यावरही तिने 13 वर्षांच्या एका मुलीशी सोशल मीडियावर संपर्क साधून जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले आणि तिला पुन्हा अटक करण्यात आली.
ही महिला कोलंबिया स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये काम करत होती आणि EO Smith हायस्कूलमध्ये प्रशासकीय सहाय्यक म्हणूनही काम करत होती. प्रकरण समोर आल्यानंतर तिला तत्काळ कामावरुन काढण्यात आले. शाळातील प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.
क्रॅनिकला अल्पवयीन मुलाला फूस लावणे आणि लैंगिक शोषणास भाग पाडणे यांसारख्या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागणार असून, तिला किमान 10 वर्षांपासून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.