US Iran War Land Invasion pudhari
आंतरराष्ट्रीय

US Iran War Land Invasion: मोठी बातमी! अमेरिकेनं इराणला चारही बाजूंनी घेरलं... ५० हजार सैनिक तैनात

Anirudha Sankpal

US Iran War Land Invasion: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने प्रचंड मिसाईल आणि ड्रोन हल्ले करून देखील इराण मागे हटण्यास तयार नाही. अमेरिका देखील इराण युद्ध लवकर संपवण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये. त्यातच आता मध्य पूर्व आशियातील अमेरिकेच्या तैनात असलेल्या सैनिकांची संख्या ५० हजारांपर्यंत पोहचली आहे. ही सामान्य परिस्थितीपेक्षा १० हजारांनी जास्त आहे.

इराणची घेराबंदी

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार २५०० मरीन, २५०० नेव्हीचे नवे जत्थे मध्य पूर्व आशियात दाखल झाले आहेत. अमेरिका या भागात मजबूत घेराबंदी केली जात आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की कधीही काहीही होऊ शकतं. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे इराणसोबत एक महिना सुरू असलेल्या युद्धाबाबत पुढचा निर्णय घेणार आहेत. यात इराणचे रणनैतिक बेटे ताब्यात घेण्याची योजना सामील असू शकते.

50 हजार सैनिक तैनात मात्र..

अमेरिकेच्या लष्कराने आपली ८२ एअरबॉर्न डिव्हिजनचे जवळपास २००० पॅराट्रुपर्स इराणजवळ तैनात केले आहेत. ही सर्व लष्करी कवायत होर्मुझ स्ट्रेटवरील इराणचे नियंत्रण कमी करून त्यावर ताबा मिळवण्यासाठी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

मात्र लष्करासंबंधीचे जाणकार सांगतात की इराणसारख्या मोठ्या देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी ५० हजार सैनिकांची तादक ही खूप कमी आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेची लढाऊ विमाने इराणच्या मुख्य तेल निर्यात केंद्रांवर खार्ग बेटासह ९० ठिकाणी बॉम्बवर्षाव करत आहेत.

होर्मुझ खुला करण्याचं आव्हान

जगाचं जवळपास २० टक्के तेल या होर्मुझ सामुद्रधूनीमधून प्रवास करतं. इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळं हार्मुझ ठप्प झालं आहे. ट्रम्प प्रशासन हा जलमार्ग पुन्हा सुरक्षित करण्यासाठी या बेटाच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT