Piyush Goyal  Canva Image Pudhari
आंतरराष्ट्रीय

India- US Trade Talk : भारत - अमेरिका टॅरिफ टॉकची गाडी आली रूळावर.... दिल्लीत तोडगा निघणार?

Anirudha Sankpal

US - India Trade Talk :

केंद्रीय कॉमर्स वाणिज्य पियूष गोयल हे अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वॉरवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी न्यूयॉर्कला गेले होते. यावेळी झालेली बैठक ही समाधाकारक होती असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. याचबरोबर सूत्रांनी सांगितलं की पुढची बैठक ही अमेरिकेचे वाणिज्य मंत्री अमेरिकेत असतील त्यावेळी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादला होता. त्यानंतर दोन्ही देशातील व्यापार संबंध ताणले गेले होते. आता द्विपक्षीय ट्रेड डीलवरील चर्चा ही सकारात्मक रितीनं पुढं जात आहे असं सूत्रांनी सांगितलं.

पियूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे. ते दोन्ही देशातील व्यापाराबाबत चर्चा करत आहेत. या चर्चेतून दोन्ही देशांच्या फायदाचं असं समाधान काढण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत असं व्यापार मंत्रालयानं सांगितलं होतं.

भारत - अमेरिका व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही चर्चा ट्रम्प प्रशासनानं भारतावर ५० टक्के ट्ररिफ लागू केल्यानंतर थांबली होती. आता व्यापार करारावर सहमतीसाठी प्रयत्न पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. अमेरिकेच्या ट्रेड टीमसोबत पुढची चर्चा नवी दिल्लीत होणार आहे.

अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे ब्रँडन लिंच करत आहेत. ते अमेरिकेचे दक्षिण - मध्य आशिया व्यापार सहाय्यक प्रतिनिधी आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला दिल्लीत आले होते. त्यानंतर दोन्ही देश हे द्विपक्षीय व्यापार करार चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयार झाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यापार करार चर्चा ही सकारात्मकदृष्टीनं पुढं जात आहे असं सांगितलं. त्यांनी संभाव्य डीलबाबतच्या अनेक गोष्टींवर चर्चा केली असून दोन्ही देश यातून दोघांना फायदेशीर ठरेल असा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक आहेत असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT