Javelin Missile System sale To India:
युनायटेड स्टेट्सनं भारताला जॅवलीन मिसाईल सिस्टम (Javelin Missile System) आणि त्याच्या संबंधित उपकरणं विकण्याची परवानगी दिली आहे. ही अँटी टँक मिसाईल सिस्टम आहे. या संभाव्य डीलचा खर्च जवळपास ४५.७ मिलियन डॉलर म्हणजे साधारणपणे ४०० कोटी रूपये असण्याची शक्यता आहे. याबाबतचे वक्तव्य बुधवारी प्रसिद्ध झालं आहे. डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात DSCA यांनी यासाठी लागणारे प्रमाणपत्र दिलं आहे अन् अमेरिकन काँग्रेसला याची माहिती दिली असल्याचं सांगितलं.
DSCA यांनी या संभाव्या डीलमुळं दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळणार आहे. तसेच भारत अमेरिका यांच्यातील रणनैतिक संबंध देखील अधिक घट्ट होणार आहेत असं सांगितलं.
भारताला ऑफर झालेल्या जॅवलीन मिसाईल सिस्टम डीलमध्ये १०० FGM-148 Javelin rounds एक जॅवलीन FGM-148 मिसाईल आणि २५ लाईट वेट कमांड लाँच युनिट किंवा जॅवलिन १ ब्लॉक कमांड लाँच युनिट्स यांचा समावेश असणार आहे.
या पॅकेजमध्ये Javelin LwCLU or CLU Basic Skills Trainers, मिसाईल स्टिम्युलेशन राऊंड्स, बॅटरी कुलंट युनिट, इंटरॅक्टिव्ह टेक्निकल मॅन्युअल, जॅवलीन ऑपरेशन मॅन्युअल, लाईफ सायकल सपोर्ट, स्पेअर पार्ट्स यासह अनेक सहाय्यक गोष्टींचा देखील समावेश असणार आहे.
डीएससीएनं सांगितलं की या संभाव्य डीलमुळं अमेरिकेचा संरक्षण विषयक भागीदार असलेल्या भारताची लष्करी क्षमता वाढणार आहे. याचबरोबर इंडो पॅसिफीक आणि दक्षिण आशियाई भागात राजकीय स्थैर्यता, शांतता आणि आर्थिक विकास वाढीसाठी ही डील उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
DSCA पुढे म्हणाले, 'भारताला भविष्यातील धोका ओळखून आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी ही डील उपयुक्त ठरणार आहे. भारताला ही उपकरणे आणि सेवा त्यांच्या लष्करी सेवेत सामावून घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.'
DSCA ने या डीलमुळं अमेरिकेच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही असा देखील दावा केला आहे.
Javelin FGM-148 ही अमेरिकन मॅन पोर्टेबल फायर आणि अँटी टँक मिसाईल सिस्टम आहे. ही सिस्टम १९९६ पासून अमेरिकेच्या लष्करी सेवेत आहे. त्यांनी एम ४७ ड्रॅगन अँटी टँक मिसाईलची जागा घेतली होती.
ODIN ने दिलेल्या माहितीनुसार जॅवलीन FGM-148 हे ऑटोमेटिक इन्फारेड गायडन्स सिस्टमचा वापर केला जातो. त्यामुळं मिसाईल लाँच केल्यानंतर वापरकर्त्याला त्वरित कव्हर शोधता येतं. यापूर्वी ड्रॅगन अँटी टँक सिस्टममध्ये वायर्ड गायडेड सिस्टम होती.
जॅवलीन अँटी टँक गायडेड मिसाईल सिस्टम ही आर्मर्ड गाड्यांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहे. त्याचबरोबर याचा वापर बिल्डिंगमधील लपलेल्या टार्गेटला देखील भेदण्यासाठी होतो. जॅवलीन FGM-148 ची रेंज ही top-attack mode मध्ये ५०० फूट तर डायरेक्ट फायर मोडमध्ये १९० फूट इतकी आहे.