UK first Muslim PM: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान केर स्टार्मर यांचे पद धोक्यात असून त्यांनी एप्स्टिन फाईलमध्ये नाव आलेल्या पीटर मंडेल्सन यांची अमेरिकेचे राजदूत म्हणून वॉशिंग्टनमध्ये नियुक्ती केली होती. पीटर यांचे जेफ्री एप्स्टिनसोबत जुने संबंध असल्याचं उजेडात आलं आहे. यामुळे आता स्टार्मर यांचे पंतप्रधानपद धोक्यात आलं आहे.
वेस्टमिनिस्टरमध्ये युकेला पहिली मुस्लीम महिला पंतप्रधान मिळणार असल्याची अफवा पसरली आहे. शबाना महमूद या युकेच्या पुढच्या पंतप्रधान होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. शबाना या सध्याच्या घडीला युकेच्या गृह सचिव आहेत. लेबर पार्टीमध्ये त्याच पुढच्या पंतप्रधान पदाच्या दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. जर असं झालं तर शबाना या युनायटेड किंगडमच्या पहिल्या मुस्लीम पंतप्रधान होतील.
शबाना महमूद या ४५ वर्षाच्या असून त्या पेशानं वकील आण राजकारणी आहेत. त्या स्टार्मर यांच्या महत्वाच्या साथीदार आहे. पक्षामध्ये त्या एक उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म हा बर्मिंगहममध्ये झाला आहे. त्या झुबैदा आणि महमूद अहमद यांच्या कन्या आहेत. मूळचे पाकिस्तानी असलेले महमूद अहमद आणि झुबैना या पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूर शहरातील रहिवासी आहेत.
शबाना महमूद यांनी २०२५ मध्ये आपल्या पदाचा कार्यभार सांभाळायला सुरूवात केली होती. त्या युकेची सीम सुरक्षा सांभाळण्याची अवघड जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी २००२ मध्ये लिंकलन कॉलेज ऑक्सफर्ड इथून कायद्याची डिग्री घेतली होती. त्यानंतर त्यांनी बार व्होकेशनल कॉर्स हा Inns of Court School of Law मधून पूर्ण करत पुढच्याच वर्षी बॅरिस्टर पदवी मिळवली.
२०१० मध्ये त्या युकेच्या पहिल्या महिला मुस्लीम खासदार बनल्या होत्या. त्यांच्या सोबत रूशनारा अली आणि यास्मिन कुरेशी देखील खासदार झाल्या होत्या.
शबाना महमूद यांची ओळख आणि राजकीय भूमिका ही दुहेरी आहे. त्या एक मुस्लीम म्हणून प्रो पॅलस्टीन लोकांपर्यंत पोहचू शकतात. गेल्या काही काळापासून लेबर पार्टीसोबतचा या लोकांचा कनेक्ट तुटला आहे. तो पुन्हा जोडण्याचं काम महमूद करू शकतात. मात्र असं असलं तरी त्यांनी इस्त्रायलच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिला आहे.
स्थलांतरितांबाबत देखील त्यांची भूमिका कठोर आहे. होम सेक्रेटरी म्हणून त्यांनी नुकतेच युकेमध्ये कायमचं रहिवासी होण्याचा मार्ग खडतर करण्याची योजाना जाहीर केली होती. त्यांच्या मते कायमचं रहिवासी होणं हा अधिकार नाही तर भाग्य आहे.