Tulasi Gabbard pudhari
आंतरराष्ट्रीय

Tulasi Gabbard: वुहान लॅबला अमेरिकेतून लाखो डॉलरचा सरकारी निधी; तुलसी गबार्ड यांचा मोठा गौप्यस्फोट... गोपनीय कागदपत्रे उघड

Anirudha Sankpal

Tulasi Gabbard On Wuhan Lab: अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी जाता जाता अनेक गौप्यस्फोट करून फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात एक खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी शेवटच्या दिवशी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अँथनी फॉसी यांच्याबाबतची गोपनीय कागदपत्रे उघड करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टर फॉसी यांनी चीनच्या वुहान लॅबला लाखो डॉलर्सचा सरकारी निधी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पैशाचा वापर हा वटवाघळापासून होणाऱ्या कोरोना विषाणूला अजून धोकादायक करण्याच्या संशधोनात झाला. ज्यावेळी जगभारत कोरनाचा प्रसार झाला त्यावेळी फॉसी यांनी हा व्हायरल वुहानच्या लॅबमधून लीक झाल्याची गोष्ट दाबून ठेवली. गबार्ड यांच्या मते फॉसी यांनी २०२४ मध्ये अमेरिकन संसदेसमोर शपथ घेऊन खोटे वक्तव्य केलं.

२०२० मध्ये अमेरिकेत कोरोना पसरला त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प सरकारने त्यावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी डॉक्टर फॉसी यांच्याकडे सोपवली होती. दरम्यान, अमेरिकेने कोणत्या कामासाठी फॉसी यांना निधी दिली होता. तर फॉसी यांना गेन ऑफ फंक्शन रिसर्चसाठी निधी मिळाला होता. हे असं संशोधन आहे ज्यात एखाद्या विषाणूला प्रयोगशाळेत जाणूनबुजून अधिक शक्तीशाली केलं जातं. त्याची व्हायरलिटी अधिक धोकादायक बनवली जाते. भविष्यात कोणताही विषाणू मानवावर किती मोठा हल्ला करू शकतो त्याची लस कशी तयार करायची हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक हे संशोधन करत होते. मात्र यात असा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडण्याचा मोठा धोका असतो.

कोविड - १९ शी काय संबंध?

तुलसी गबार्ड यांनी दावा केला आहे की वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत ववाघळाच्या कोरोना विषाणूवर अशाच प्रकारचे धोकादायक संशोधन सुरू होतं. याचप्रयोगशाळेत अपघात झाला अन् तो जगभर पसरला.

सत्य लपवण्यासाठी फॉसी यांनी एक बनावट शास्त्रीय पेपर तयार करवून घेतला. त्यांच्या आवडत्या आणि फेव्हरेबल शास्त्रज्ञांना गुप्तचर संस्थेकडे पाठवून अधिकृत अहवाल लिहून घेतला. कोरोना प्रयोगशाळेतून नाही तर नैसर्गिकरित्या मानवांमध्ये पसरला असा पेपर तयार करण्यात आला.

व्हिसलब्लोअर्सच्या साक्षीवरून स्पष्ट होते की गुप्तचर विश्लेषकांनी फॉसी यांच्या थेअरीवर आक्षेप नोंदवले होते. मात्र त्या विश्लेषकांना करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. छळ करण्यात आला आणि त्यांना सिस्टमधून बाजूला सारण्यात आलं.

ट्रम्प सरकारमधील सर्वोच्च पदावरील हिंदू अधिकारी

ट्रम्प सरकारच्या सर्वोच्च हिंदू अधिकारी तुलसी गबार्ड यांनी 22 मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तुलसी अमेरिकेच्या 'डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स'च्या प्रमुख होत्या, त्यांच्या अंतर्गत 18 गुप्तचर संस्था काम करत होत्या.

फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांचे पती एका अत्यंत दुर्मिळ हाडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत आणि गबार्ड या कठीण काळात त्यांच्यासोबत राहू इच्छितात. अहवालानुसार, गबार्ड यांनी शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली असता त्यांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT