Donald Trump Iran Trade Tariff pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Iran Trade Tariff: ट्रॅम्प यांचा भारतावर अजून एक 'वार'... इराणशी व्यापार करणाऱ्यांवर २५ टक्के टॅरिफ

US Tariff On India Increase 75% : अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळं भारतावरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता.

Anirudha Sankpal

US Tariff On Iran Trade country: इराणमधील आंदोलकांवर केलेल्या कारवाईत जवळपास ६०० नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिका इराणवर लष्करी करावाई करण्याच्या तयारीत आहे. त्याच जोडीला इराणला एकटं पाडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्म प्रशासनाने टॅरिफ वार देखील करण्याचं ठरवलं आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं केली आहे. त्याचा परिणाम हा भारत आणि चीन सारख्या देशांवर होणार आहे. इराणशी भारत आणि चीनचा सर्वाधिक व्यापार आहे.

ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर, 'तत्काळ प्रभावानं आम्ही जो देश इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण सोबत व्यापार करेल त्या देशावर २५ टक्के टॅरिफ लावत आहोत. हा अंतिम आणि निर्णायक आदेश आहे.' अशी पोस्ट केली.

अमेरिकेचा हा टॅरिफ वार डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता असताना आला आहे. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी केरोलाई लिविट्ट यांनी सोमवारी 'आमच्याकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी एअर स्ट्राईक हा पर्याय वापरला जाऊ शकतो.' असे वक्तव्य केले होते.

मात्र त्यांनी इराणने स्टीव्ह विटक्रॉफ्ट यांच्यासोबत राजनैतिक पर्याय देखील ओपन ठेवला आहे. खासगीत इराण सार्वजनिक वक्तव्यांपेक्षा खूप वेगळी भूमिका घेत आहे.

भारतावर काय परिणाम होणार?

इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हा चीन असला तरी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या या टॅरिफ वारचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. त्याच्या जोडीला युएई, तुर्की यांच्यावर देखील याचा मोठा परिणाम होईल. हे इराणचे मोठे व्यापार भागीदार आहेत.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार भारत इराणला १.२४ बिलियन डॉलर्सच्या वस्त निर्यात करतो. ही आकडेवारी २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाची आहे. त्याचबरोबर भारत इराणमधून ०.४४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू आयात करतो. म्हणजे इराणसोबत भारताचा एकूण व्यापार हा १.६८ डॉलर्सचा आहे. याची रूपयात अंदाचे किंमत ही वर्षाला १४ ते १५ हजार डॉलर्स इतकी होते.

ट्रेड डीलवरही होणार मोठा परिणाम?

यात रासयनांचा वाटा हा ५१२.९२ मिलियन डॉलर्स इकता आहेत. त्यानंतर फळे, नट्स आणि लिंबूवर्गीय फळांचा रस यांचा वाटा ३११.६० मिलिनयन्स डॉलर्स इतका आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारतावर रशियाचे तेल खरेदी करतात म्हणून ५० टक्के टॅरिफ लावला आहे.

या नव्या टॅरिफमुळे यात अजून वाढ होणार आहे. दरम्यान, दोन्ही देश अनेक महिन्यांपासून ट्रेड डील फायनल करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. त्याच्यावर नव्या टॅरिफमुळं मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे

जरी अमेरिकेने भारतासह अनेक देशांविरूद्ध टॅरिफ वार करणं सुरू केलं असलं तरी हे सर्व निर्णय अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ग्लोबल टॅरिफ केसवर अवलंबून आहेत. जर निर्णय ट्रम्प यांच्या विरोधात लागला तर ट्रम्प यांच्या या निर्णयांना मोठा धक्का बसेल. सर्वोच्च न्यायायलात बुधवारी याबाबत सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT