Trump - Epstein statue 
आंतरराष्ट्रीय

Trump - Epstein statue : ट्रम्प आणि एपस्टाईन यांचा 'टायटानिक पोझ'मधील पुतळा पाहिला का?

मॅसॅच्युसेट्समधील नॅनटकेट (Nantucket) या शहरात एका रस्त्याच्या कडेला उभारलेल्या पुतळा ठरला वादाचे कारण

Namdev Gharal

Trump - Epstein statue अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांचा एक वादग्रस्त पुतळा सध्या सोशल मीडियावर आणि अमेरिकन राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा पुतळा 'टायटानिक' चित्रपटातील प्रसिद्ध 'रोझ आणि जॅक' यांच्या पोझमध्ये साकारण्यात आला असून, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा पुतळा मॅसॅच्युसेट्समधील नॅनटकेट (Nantucket) या शहरात एका रस्त्याच्या कडेला उभारण्यात आला होता.

सेक्स ट्रॅफिकींगमधील जेफ्री एपस्टिन फाईल्स मुळे जगात अनेक देशात खळबळ माजली आहे. लंडनच्या राजपुत्र अॅड्रयुज याला तर अटक झाली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष याचे फोटो व्हिडीओ अनेकवेळा या फाईल्समध्ये आले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी कोणी अज्ञातांनी हा पुतळा उभा केला आहे.

हा पुतळा प्रत्यक्ष कोणी उभा केला हे समोर आले नसले तरी तो एका कलात्‍मक निषेधाचा भाग आहे. यामध्ये डोनल्ड ट्रम्प मागे उभे असून त्यांनी एपस्टाईनला कंबरेत धरले आहे, जसा टायटानिकमधील प्रसिद्ध सीन आहे.

काय आहे पार्श्चभूमी

जेफ्री एपस्टाईन हा अल्पवयीन मुलींच्या मानवी तस्करीच्या (Sex Trafficking) प्रकरणात आरोपी होता. २०१९ मध्ये तुरुंगात असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

ट्रम्प आणि एपस्टाईन यांचे जुने फोटो आणि संबंध यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांच्या विरोधकांनी हा पुतळा त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याच्या उद्देशाने वापरला असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेतील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांना घेरण्यासाठी अशा प्रकारच्या उपरोधिक कलाकृतींचा वापर केला जात आहे.

या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काही लोक याला 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणत आहेत, तर ट्रम्प समर्थक याला 'हीन दर्जाचे राजकारण' आणि 'अपप्रचार' ठरवत आहेत. मात्र हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT