'त्‍या' 13 विटांचं अद्भूत रहस्य, अमेरिकन सैन्याला लादेनच्या घरात सापडल्या होत्‍या 'या' खास वस्तू file photo
आंतरराष्ट्रीय

'त्‍या' 13 विटांचं अद्भूत रहस्य, अमेरिकन सैन्याला लादेनच्या घरात सापडल्या होत्‍या 'या' खास वस्तू

अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेनचा खात्‍मा केल्यावर काही वस्तूही तेथून हस्तगत केल्या होत्‍या.

पुढारी वृत्तसेवा

The amazing secret of 'those' 13 bricks, 'these' special items found by the American military in bin Laden's house

पुढारी ऑनलाईन :

तुम्हाला माहिती आहे का, ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर अमेरिकन नेव्हीच्या जवानांनी त्या घरातून १३ विटाही सोबत आणल्या होत्या? अखेर असे का करण्यात आले होते, हे जाणून घेऊया.

आजपासून १५ वर्षांपूर्वी, मे महिन्यातच अमेरिकेने पाकिस्तानातील एबटाबाद येथील एका घरावर विशेष ऑपरेशन केले होते. या कारवाईत जगातील सर्वाधिक वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झाला होता. या ऑपरेशनबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल, पण त्या वेळी अमेरिकन नेव्ही सीलच्या जवानांनी त्या घरातून १३ विटाही सोबत घेतल्या होत्या, हे तुम्हाला माहीत आहे का? आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अमेरिकन जवानांनी असे का केले आणि याची चर्चा पुन्हा का सुरू झाली आहे?

प्रत्यक्षात, अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने नुकताच सोशल मीडियावर या विटांबाबत एक पोस्ट शेअर केला आहे. त्यानंतर या विषयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. सीआयएने त्या विटांचे फोटोही शेअर केले आहेत, ज्या अमेरिकन जवानांनी एबटाबादमधील त्या घरातून आणल्या होत्या. तसेच, ज्या घरात हे ऑपरेशन पार पडले होते, त्या घराचे फोटोही सीआयएने आपल्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत.

सीआयएने आपल्या पोस्टमध्ये त्या लिंकचाही उल्लेख केला आहे, ज्यात या विटांबाबत माहिती देण्यात आली आहे. अमेरिकन सैन्याने ऑपरेशनदरम्यान तेथून अनेक पुरावे जप्त केले होते. त्यात पेन ड्राइव्ह, हार्ड ड्राइव्ह आणि या विटांचाही समावेश होता.

सीआयएच्या वेबसाइटनुसार, ओसामा बिन लादेनच्या ठिकाणावर कारवाई केल्यानंतर या १३ विटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्या विटांवर ‘A’, ‘M’ आणि 5 अशी अक्षरे लिहिलेली होती. नेव्ही सीलच्या कमांडोंनी पहिली वीट सीआयएचे तत्कालीन संचालक लिऑन पॅनेटा यांना भेट म्हणून दिली होती. ही वीट आता सीआयएच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

सीआयएने त्या घराचे मॉडेलही शेअर केले आहेत, जे ऑपरेशनपूर्वी तयार करण्यात आले होते. त्यानुसार नियोजन करण्यात आले आणि त्यानंतर लादेनविरोधात कारवाई करण्यात आली. सीआयएच्या माहितीनुसार, विशेष दलांनी ऑपरेशनपूर्वी एबटाबाद परिसराच्या प्रत्यक्ष आकाराच्या मॉडेलवर सराव केला होता.

एबटाबाद येथील परिसरावर छापा टाकण्याची योजना अतिशय काळजीपूर्वक आखण्यात आली होती, जेणेकरून शेजारी राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये. छापेमारीदरम्यान बिन लादेन मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आढळला होता. या मॉडेलचा वापर तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना माहिती देण्यासाठीही करण्यात आला होता. त्यानंतर ओबामा यांनी या कारवाईला मंजुरी दिली होती.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन यंत्रणा सतत लादेनच्या शोधात होत्या. जवळपास १० वर्षे तो लपून राहत होता. अखेर २०११ मध्ये अमेरिकेला माहिती मिळाली की लादेन पाकिस्तानातील एबटाबाद येथील एका घरात लपला आहे. त्यानंतर सीआयएने विशेष ऑपरेशन राबवून २ मे २०११ रोजी लादेनला ठार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT