आंतरराष्ट्रीय

फ्लोरिडामध्ये भारतीय विद्यार्थीनीला कारने चिरडले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणामधील भुवनगिरी जिल्‍ह्यातील २५ वर्षीय विद्‍यार्थीनीचा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गुंटीपल्ली सौम्या असे तिचे नाव आहे. सोमवार २६ मे रोजी रस्‍ता ओलांडताना भरधाव कारने तिला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, सौम्‍या जागीच ठार झाली, असे वृत्त 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

गुंटीपल्ली सौम्या ही मूळची तेलंगणामधील भुवनगिरी जिल्‍ह्यातील यादगारिपल्ले गावची होती. दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली होती. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्‍या शोधात होतील. सोमवारी सायंकाळी किराणा सामान खरेदी करण्‍यासाठी ती गेली होती. यावेळी भरधाव कारने दिलेल्‍या धडकेत तिचा जागीच मृत्‍यू झाला.

आई-वडिलांवर मोठा आघात

सौम्‍याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले होते. ती नोकरीच्‍या शोधात होती. तिच्‍या अपघाती निधनानंतर तिचे आई-वडील कोटेश्वर राव आणि बालमणी यांच्‍यावर मोठा आघात झाला आहे. सौम्याच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह तेलंगणात परत आणण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी विनंती केली आहे.

सौम्‍याचे वडील हे सीआरपीएफचे माजी जवान आहेत. नुकताच 11 मे रोजी सौम्‍याचा 25 वा वाढदिवस साजरा करण्‍यात आला होता. वाढदिवसानिमित्त मी तिच्यासाठी कपडे देखील पाठवले," असेही कोटेश्‍वर राव सांगतात. सौम्याच्या वडिलांनी तिच्या परदेशातील शिक्षणासाठीच्‍या आर्थिक तरतुदीसाठी खूप संघर्ष केला. आपल्‍या मुलीला तिची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळावी, यासाठी त्‍यांचे मोठे योगदान होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT