Colorado Terror Attack : अमेरिकेतील कोलोरॅडोमधील मॉलमध्ये रविवारी इस्रायल समर्थक निदर्शकांवर एकाने हल्ला केला. त्याने जमावावर ज्वालाग्राही वस्तू फेकल्या.यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ब्रॉडवेपासून पश्चिमेकडे, उत्तरेकडे पाइन स्ट्रीट, पूर्वेकडे १६ वा स्ट्रीट आणि दक्षिणेकडे वॉलनट स्ट्रीटपर्यंतचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायलवर भीषण हल्ला केला. यावेळी काही इस्त्रायलच्या नागरीकांचे अपहरणही केले. या अपहृत नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्या Run for Their Lives या संस्थेने बोल्डरमधील पर्ल स्ट्रीट मॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एक ४५ वर्षीय व्यक्ती 'फ्री पॅलेस्टाईन' अशा घोषणा देत जमावावर ज्वालाग्राही वस्तू फेकल्या . यामध्ये सहा जण जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीवरून हे लक्षात येते की, हा हेतुपुरस्सर हिंसाचाराचा प्रकार आहे. या घटनेचा तपास दहशतवादी कृत्य म्हणून केला जात असल्याचे एफबीआयने स्पष्ट केलेआहे.
जमावावर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद सोलिमान असे सांगितले जात आहे. एफबीआय संचालक काश पटेल यांनी देखील या घटनेला 'दहशतवादी हल्ला' असे म्हटले आहे. तर कोलोराडोचे अॅटर्नी जनरल फिल वेझर यांनी याला द्वेषमूलक गुन्हा म्हणत नोंद घेतली. गाझामध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्यानंतर अमेरिकेतही तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका भरात ज्यू-विरोधी द्वेषगुन्ह्यांत वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल समर्थक नेत्यांनी पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने यांना ज्यू-विरोधी ठरवले आहे. ट्रम्प प्रशासनाने अशा निदर्शकांना अटक केली असून, अशा निदर्शनांना अनुमती देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचा निधी रोखण्यात आला आहे.
कोलोराडो विद्यापीठातील .िविद्यार्थी ब्रुक कॉफमन म्हणाला की, हल्ल्यानंतर चार महिलांना जमिनीवर बसलेल्या पाहिले. त्यांच्या पायांवर भाजल्याचे दिसले. त्यातील एक महिला गंभीररित्या भाजली असून तिला एखाद्याने झेंड्याने झाकले होते. ही घटना अत्यंत भयावह आहे आणि अशी घटनांची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये. आपल्याला अशा प्रवृत्तीविरुद्ध उभे राहिले पाहिजे,” असे आवाहनही त्याने केले आहे.