taliban bans chess in afghanistan over religious concerns
काबुल : पुढारी ऑनलाईन
सध्याच्या २१ व्या शतकात जग चंद्रावर पोहोचले आहे. मात्र या कोणत्याही गोष्टीशी संबंध नसलेला तालिबान अजुनही डोंगरावरच आहे. तालिबानच नाव समोर येण्याचे कारण म्हणजे, अफगाणिस्तानात आता बुद्धिबळ खेळण्यास तालिबानने अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.
तालिबानच्या नेतृत्वाखालील खेळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ११ मे दिवशी बुद्धिबळाच्या खेळावर बंदी घातल्याचे स्पष्ट केले. धार्मिक बाबींबाबत योग्य प्रतिसाद मिळेपर्यंत देशात या खेळावर बंदी राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
तालिबानने धार्मिक कारणांनी अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळण्यावर बंदी घातली. या प्रकारच्या विचित्र गोष्टीचे कारण देत तालिबानने मनोरंजन आणि खेळ यांच्यातील विविध स्वरूपांचा विरोध कायम ठेवला आहे. अफगाणिस्ताच्या खामा प्रेसच्या अहवालानुसार, हा निर्णय 'धार्मिक विचारांच्या' तालिबानच्या सद्गुणांचे संवर्धन आणि दुष्कर्मांच्या प्रतिबंधासाठी मंत्रालयाने जाहीर केलेल्या 'धार्मिक दृष्टिकोनांमुळे' आणि निर्बंधांमुळे हा निर्णय घेण्यात आला.
तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळण्यावर अनिश्चित काळासाठी पायबंद घालण्यात आला आहे. तालिबानच्या क्रिडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ११ मे रोजी बुद्धिबळ खेळावरील बंदीची माहिती दिली. धार्मिक बाबींबाबत योग्य प्रतिसाद मिळेपर्यंत देशात या खेळावर बंदी राहील. अहवालानुसार, या समस्यांचे निराकरण केल्याशिवाय, बुद्धिबळाशी संबंधित कोणताही क्रिडा प्रकाराचे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. खामा प्रेसच्या वृत्तानुसार, तालिबानच्या सद्गुणांच्या संवर्धन आणि दुष्कर्मांच्या प्रतिबंधक मंत्रालयाने अफगाणिस्तान बुद्धिबळ महासंघही बरखास्त केला आहे आणि इस्लामिक कायद्याच्या व्याख्येनुसार या खेळाला 'हराम' (निषिद्ध) घोषित केले आहे.
तालिबानींकडून अफगाणिस्तानमध्ये सत्ता आपल्या ताब्यात आल्यानंतर सांस्कृतिक, सामाजिक आणि खेळांच्या आयोजनांवर लावलेल्या प्रतिबंधांवर वाढत्या प्रवृत्तीनंतर घेण्यात आला आहे. तालिबानने बंदी जाहीर करण्यापूर्वी, अनेक बुद्धिबळपटू आणि अधिकाऱ्यांनी तालिबानच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी परवानगी आणि आर्थिक मदत मागितली होती. तथापि, तालिबानने बंदी जाहीर केली, ज्यामुळे खेळ खेळण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
अफगाणिस्तानात एकेकाळी बौद्धिक खेळ मानला जाणारा बुद्धिबळ अलिकडच्या काळात पुन्हा लोकप्रिय झाला आहे, राष्ट्रीय महासंघ तालिबानच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे, असे खामा प्रेसने वृत्त दिले आहे. इस्लामिक कायदेशीर व्याख्यांचा हवाला देऊन तालिबानने घेतलेली अलीकडील भूमिका अफगाणिस्तानातील सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापांवर निर्बंध घालण्याच्या त्यांच्या व्यापक धोरणे अधोरेखित करते.
बुद्धिबळावरील प्रतिबंध अफगाणिस्तामध्ये स्वातंत्र्यावर आणि तालिबानचे वाढते प्रतिबंध समोर आणत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अनेक प्रतिबंध घातले आहेत. हे केंव्हापर्यंत चालणार या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय तालिबानवर हा निर्णय रद्द करण्यासाठी दबाव आणणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान अफगाणिस्तानला जगाविरूद्ध जुन्या चालिरीतींच्या खोल खड्यात नेणाऱ्या तालिबांनींनी सहावीनंतर मुलींना शिक्षणास प्रतिबंध केला आहे आणि त्यांच्यासाठी विद्यापीठे आणि वैद्यकीय शिक्षण केंद्रांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.