स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारे सोन्याचे भांडे Pudhari photo
आंतरराष्ट्रीय

स्वयंपाक करण्यासाठी ती वापरते चक्क सोन्याचे भांडे!

सोशल मीडियावर एका चिनी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : लोक स्वयंपाकासाठी अनेकदा स्टील, लोखंड आणि अॅल्युमिनियमची भांडी वापरतात; पण तुम्ही कधी सोन्याच्या भांड्यात अन्न शिजवताना पाहिले आहे का? हो, सोशल मीडियावर एका चिनी महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती केवळ सोन्याच्या भांड्यात अन्न शिजवत नाही, तर त्याच भांड्यात अन्नही खात आहे. हे पाहून सोशल मीडिया वापरकर्तेही थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ चीनमधील आहे.

दक्षिण चीनमध्ये राहणाऱ्या या महिलेने शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात अन्न शिजवले आहे. मीडिया रिपोर्टर्सनुसार, या सोन्याच्या भांड्याचे वजन १ किलोग्रॅम आहे, ज्याची किंमत ७ लाख युआन आहे. खरं तर हा एक सामान्य व्हिडीओ नाही, तर एक प्रमोशनल व्हिडीओ आहे. या महिलेचे दक्षिण चीनमधील शुईबेई येथे एक अतिशय प्रसिद्ध सोन्याचे दुकान आहे. या दुकानाचे नाव शेन्झेन गोल्ड अँड ज्वेलरी हब आहे. एका ग्राहकाच्या विनंतीवरून महिलेने हे सोन्याचे भांडे बनवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT