Saudi Aramco halts oil supply India pudhari
आंतरराष्ट्रीय

Saudi Aramco halts oil supply India: सौदी आरामको'कडून भारताचा तेलपुरवठा खंडित; महागात कच्चे तेल खरेदी करावे लागणार?

Anirudha Sankpal

Saudi Aramco halts Oil Supply India: यमनमधील इराण-समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या तेल वाहतूक करणाऱ्या महत्त्वाच्या 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन'वर केलेल्या ड्रोन हल्ल्यांचे गंभीर परिणाम भारतासह जगावर झाला आहे. सौदी अरेबियाची प्रमुख तेल कंपनी 'सौदी आरामको'ने भारताचा ऑक्टोबर महिन्यापासूनचा तेलपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ईस्ट-वेस्ट पाइपलाइनवर ड्रोन हल्ले

लाल समुद्रात जाणाऱ्या १,५०० किमी लांबीच्या 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन'वर हूती बंडखोरांकडून ड्रोन हल्ले झाल्यामुळे तेलवाहतूक विस्कळीत झाली आहे.

या निर्णयामुळे भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांना इतर स्रोतांकडून महागात कच्चे तेल खरेदी करावे लागणार असल्याने भारतावर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.

युरोपलाही फटका बसण्याची शक्यता

युरोपमधील किमान तीन तेल कंपन्यांचा पुरवठाही प्रभावित होणार असून युरोपलाही याचा फटका बसू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता वर्तवली आहे. या संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०८ डॉलरवर पोहोचले असून ते आणखी वाढण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT