File Photo 
आंतरराष्ट्रीय

Russia Ukraine : युक्रेनमध्‍ये अडकलेल्‍या भारतीय विद्यार्थी, परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाची तयारी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूर्व युरोपियन भागात संघर्ष दिवसेंदिवस चिघळत आहे. (Russia Ukraine) या पार्श्वभूमीवर येथे अडकेलल्या भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी खार्किव आणि सुमी या युक्रेनमधील पूर्वकडील शहरांमध्ये जाण्यासाठी रशियन बसेस क्रॉसिंग पॉईंटवर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिली.

युरोपमधील सर्वात मोठ्या युक्रेनच्या झापोरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर अल्बानिया, फ्रान्स, आयर्लंड, नॉर्वे, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांनी १५- राष्ट्रीय परिषदेने शुक्रवारी आपत्कालीन सत्र आयोजित केले होते.
या बैठकीत संयुक्त राष्ट्रातील रशियाचे स्थायी प्रतिनिधी वसिली नेबेंझिया यांनी सांगितले की, "युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांचे शांततापूर्ण निर्वासन सुनिश्चित करण्यासाठी रशियन सैन्य सर्व काही करत आहे. परंतु, पूर्व युक्रेनच्या खार्किव आणि सुमी शहरांमधून दहशतवादी सक्तीने नागरिकांना बाहेर पडू देत नाहीत", असा आरोप त्यांनी युक्रेनवर केला.

याचा परिणाम केवळ युक्रेकच्‍या नागरिकांसह  परदेशी नागरिकांवरही होत आहे. युक्रेनियन नागरिक ज्यांना बळजबरीने ठेऊन घेत आहेत. त्यांची संख्या मोठी असून खार्किवमध्ये भारताचे ३ हजार १८९, व्हिएतनामचे २ हजार ७०० , चीनचे २०० नागरिक आहेत. तर सुमीमध्ये भारताचे ५७६, घानाचे १०१ , चीनचे १२१ नागरिक आहेत, असे नेबेंझिया यांनी  सांगितले. नेखोतेवका' आणि 'सुदजा' या क्रॉसिंग पॉइंट्स सज्ज असून आज सकाळी ६ वाजल्यापासून खार्किव आणि सुमीमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात १३० आरामदायी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडिओ :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT