आंतरराष्ट्रीय

रशिया, उत्तर कोरियाची ‘दिल, दोस्ती’: पुतिन यांच्याकडून किम जोंगना शस्त्रसज्ज कार भेट

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे सत्ताधिश किम जोंग उन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पुतिन आणि किम जोंग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पुतिन कार ड्राईव्ह करताना दिसत आहेत, तर किम जोंग बाजूच्या सीटवर बसले आहेत. विशेष म्हणजे या लाँग ड्राईव्हनंतर पुतिन यांनी ही कार किम जोंग यांना भेट दिली. ही कार रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची कार आहे.

फेब्रुवारी महिन्यात याच मॉडेलची एक कार किम जोंग यांना भेट दिली होती.

पुतिन यांनी फेब्रुवारी महिन्यात याच मॉडेलची एक कार किम जोंग यांना भेट दिली होती. त्यामुळे किम जोंग यांच्याकडे आता अशा प्रकारच्या दोन कार झालेल्या आहेत.

रशियाचा राष्ट्राध्यक्ष लिमोझिन ऑरस ही शस्त्रसज्ज कार वापरतात. ही कार रशियातच बनवलेली आहे. किम जोंग यांना विविध कार चालवण्याचा शौक आहे, त्यामुळे पुतिन यांनी त्यांना ही कार गिफ्ट दिली आहे. यातील विशेष बाब अशी आहे की उत्तर कोरियाला अधिकृतरीत्या वाहने पुरवण्यास संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे, तरीही किम जोंग यांनी तस्करीच्या मार्गाने अलिशान गाड्या जमवल्या आहेत. तर किम जोंग यांनी पुतिन यांना एक कुत्र्याचे पिल्लू भेट दिले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT