Russian Daredevils pudhari
आंतरराष्ट्रीय

Russian Daredevils: रशियन जोडपं एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या टोकावर चढलं... अंगठी घातली, किस केला अन् अटक झाली; Video व्हायरल

Anirudha Sankpal

Russian Daredevils Video: एक रशियन धाडसी जोडपं हे न्यूयॉर्क सिटीमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या सर्वोच्च शिखरावर चढलं होतं. ३२ वर्षाचा इव्हान बीर्कुस आणि ३३ वर्षाची अँजेला निकोलाऊ यांनी हा स्टंट केला. ते तिथं जाऊन फक्त थांबले नाहीत तर त्यांनी १४५४ फूट उंचीवर जाऊन आपला सारखपुडा देखील आटपून घेतला. इवानने गुडघा टेकून अँजेलाच्या बोटात अंगठी घातली त्यानंतर दोघांनी एकमेकांना किस देखील केला. ते या इमारतीवर जवळपास १० मिनिटे होते. त्यात त्यांनी हा कारभार केला. या प्रकरणी पोलिसांनी या रशियन कपलला अटक केली आहे.

या जोडप्याने आपल्यासोबत एक काळ्या रंगाचे मोठे कापडी बॅनर देखील नेले होते. त्यांनी इमारतीच्या शिखरावर पोहचल्यावर हे बॅनर तिथल्या लोखंडी स्टॅक्चरला बांधलं. त्यावर लिहिलं होतं की, 'ज्यावेळी प्रेमाची ताकद ही ताकदीच्या प्रेमावर मात करते त्याला शांतता म्हणतात.' याच्याशी साधर्म्य असलेला मेसेज हा १९ व्या षटकातील गिटारवादक जिमी हेंड्रिक्स यांच्या गिटारवर असयचा.

या रशियन जोडप्याने काळ्या रंगाचे स्टीटवेअर स्टाईलचे कपडे घातले होते. त्यांना त्यांनी केलेल्या कारनाम्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी ते आपला धाडकी एन्गेजमेंट सोहळा आटपून खाली आले त्यावेळी त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्यावर घरफोडी, धोकादायक स्थिती निर्माण करणे यासारखे अनेक चार्जेस लावण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलीस कमिश्नर जेसिका टिस्च यांनी पोलिस अधिकार्यांचे बॉडी कॅमेरा फुटेज रिलीज केले आहे. एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या रशियन कपलने जो कारनामा केला आहे त्याचा भाडेकरू, व्हिजिटर्स किंवा पाहुण्यांना कोणताही धोका निर्माण झाला नाही. या उंच भागाच्या बरोबर खाली ऑब्जर्वेशन डेस्क आहे.

इवान आणि अँजेला हे मुळचे मॉस्को शहरातील आहेत. ते सध्या न्यू जर्सीमधील ईस्ट ऑरेंज भागात रहात आहेत. त्यांचे रिलेशनशिप आणि धाडसी क्लायम्बिंगचा छंदाची दखल नेटफ्लिक्सने देखील घेतली असून २०२४ मध्ये त्यांच्यावर स्कायवॉकर अ लव्ह स्टोरी या नावाने डॉक्युमेंटरी देखील करण्यात आली आहे. ही डॉक्युमेंटरी जानेवारी २०२४ च्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील झळकली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT