Russia Drone Attack On Ukraine pudhari
आंतरराष्ट्रीय

Russia Drone Attack On Ukraine: सर्वांचे लक्ष होर्मुझवर असताना रशियाने गेम केला... संपूर्ण वर्षात झालं नाही ते एका दिवसात केलं

Anirudha Sankpal

Russia Drone Attack On Ukraine: इराण अन् अमेरिका यांच्यातील शांती करार अजून काही दृष्टीक्षेपात दिसत नाहीये. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी अडवून धरत जगात ऊर्जा संकट निर्माण केलं आहे. अमेरिका अन् इराण यांच्यात पुन्हा एकदा लष्करी संघर्ष सुरू होणार असं वाटत असताना तिकडं रशिया युक्रेन युद्धभूमीतून मोठी बातमी समोर येत आहे.

युक्रेनची हवाई सुरक्षा भेदण्याचा मोठा प्रयत्न

रशियाने युक्रेवर २४ तासात १५६७ ड्रोनचा हल्ला केला आहे. ड्रोनची संख्या इतकी मोठी आहे की याची कल्पना येणं कठिण झालं आहे. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी स्वतः हा आकडा दिला आहे. या हल्ल्यात रशियाने ड्रोन पाठोपाठ मिसाईल देखील दागले होते. रशियाचे टार्गेट हे युक्रेनची हवाई सुरक्षा नष्ट करणे हे होते. त्याचबरोबर वीज देखील खंडीत करण्याचा या हल्ल्याचा उद्येश होता. सामान्य नागरिकांना नुकसान पोहचवणे हा देखील या हल्ल्याचा उद्देश असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

एका वर्षातील ड्रोन एका दिवसात

आम्ही हा हल्ला किती मोठा होता हे पाहण्यासाठी जुन्या हल्ल्यांशी त्याची तुलना केली. दिसेंबर २०२२ ते जुलै २०२३ या पहिल्या ११ महिन्यात रशियाने एकूण जेवढे ड्रोन फायर केले होते त्यापेक्षाही जास्त ड्रोन त्यांनी एका दिवसात दागले आहेत. या हल्ल्यावरून रशियाने आता ड्रोन तयार करणे आणि त्याचा वापार करणे वाढवले आहे असे दिसते. सुरूवातीला रशिया काही डझन ड्रोन पाठवत होता. आता हजारो ड्रोन एकाचवेळी पाठवले जात आहे. याचा उद्येश हा युक्रेनची एअर डिफेन्स सिस्टमला ओव्हरलोड करणं हा आहे. यातील काही ड्रोन वाचून आपल्या टार्गेटपर्यंत पोहचू शकतात.

युद्ध आता पूर्वीसारखं राहिलं नाही

२०२२ मध्ये ज्यावेळी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं होते त्यावेळी रशिया प्रामुख्याने टँक, तोफा आणि सैनिकांना घेऊन लढाई करत होता. आता २०२६ मध्ये पूर्णपणे बदल झाला असून ड्रोन आता या युद्धात सर्वात मोठे शस्त्र झाले आहे. दोन्ही देश स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर ड्रोन तयार करत आहेत. रशिया चीन आणि इराणच्या मदतीने शाहीद सारखे ड्रोन तयार करत आहे.

एका दिवसात १५६७ ड्रोनचा हल्ला हा फक्त आकडा नाही तर युद्धाच्या रणनितीत देखील बदल झाल्याचे दर्शवते. रशिया सतत हल्ला करून आता युक्रेनची अर्थव्यवस्था, इलेक्ट्रिसिटी प्लांट, रेल्वे आणि शहरांना टार्गेट करत आहे. यामुळं युक्रेनच्या लष्करी आणि सामान्या लोकांवर दबाव वाढत आहे.

मोठं नुकसान

या हल्ल्यामुळं युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले आहेत. कीव शहरासह अनेक शहरांमध्ये एअर स्ट्राईकचे सायरन वाजले. युक्रेन डिफेन्सने अनेक ड्रोन पाडले. मात्र ड्रोनची संख्या जास्त असल्यानं त्यांना प्रत्येक ड्रोन रोखण्यात यश मिळालं नाही. या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. अनेक इलेक्ट्रिसिटी प्लांटचे देखील नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT