अमेरिकेतील शोधकर्त्यांचा मोठा दावा
काय आहे Oreshnik मिसाईल
नाटोला रोखण्यासाठी रणनिती
Russia Belarus nuclear missile: रशियाने बेलारूसच्या पूर्व भागात एका जुन्या एअरबेसवर अण्वस्त्रवाहू हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या सर्व्हेलन्स सॅटेलाईट फोटोच्या अभ्यासानंतर हा दावा करण्यात येत आहे. जर रशिया अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रे तैनात करत असेल तर संपूर्ण युरोप रशियाच्या रडारवर असणार आहे. अमेरिकेच्या रिसर्चरचा दावा हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या निष्कर्षांशी साधर्म्य साधणारा आहे.
कॅलिफॉर्नियामधील मिडलबरी इस्टिट्यूट ऑफ नॅशनल स्टडीजच्या जेफ्री लुईस आणि व्हर्जिनियामधील CNA रिसर्च अँड एनलिसिस ऑर्गनाईजेशनचे डेकर एवल्थ यांनी प्लॅनेट लॅब नावाच्या एका व्यावसायिक सॅटेलाईट कंपनीच्या फोटोंचे विश्लेषण केलं. त्या फोटोमध्ये ज्या प्रकारच्या स्ट्रक्चर निर्मितीच्या हालचाली दिसल्या आहेत ज्या रशियाच्या स्ट्रॅटेजिक मिसाईल बेसशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत.
शोधकर्त्यांनी सांगितले की मोबाईल ओरेश्निक मिसाईल लाँचर हे बेलारूसच्या क्रिचेव शहराजवळील एका एअर बेसवर तैनात केले जातील याची ९० टक्के खात्री आहे. हे ठिकाण बेलारूसची राजधानी मिन्स्क पासून जवळपास ३०७ किलोमीटर पूर्व आणि मॉस्कोपासून जवळपास ४७८ किलोमीटर दक्षिण - फश्चिमेला आहे.
ओरेश्निक याचा रशियन भाषेतील अर्थ हा हेजल ट्री असा होतो. हे एक इंटर मिडिएट रेंजचे हायपरसॉनिक बॅलेस्टिक मिसाईल आहे. याची मारक क्षमता ही ५ हजार ५०० किलोमीटर आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अशा प्रकारचे मिसाईल हे बेलारूसमध्ये तैनात करू इच्छितात हे यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. मात्र याची अचूक लोकेशन अजून सार्वजनिक झालेली नाही.
रशियाने २०२४ च्या नोव्हेंबर महिन्यात युक्रेनविरूद्ध पारंपरिक शस्त्रांनी लेस ओरेश्निक मिसाईलचे परीक्षण केले होते. पुतीन यांचा दावा आहे की मिसाईल मॅक १० पेक्षाही जास्त वेगाने उडते आणि याला थांबवणे जवळपास अशक्य आहे.
जाणकारांच्या मते ओरेश्निकच्या डिप्लॉयमेंटनंतर रशियाची अण्विक शस्त्रांवरचे अवलंबत्व जास्त स्पष्ट होते. याचा उद्येश हा नाटो देशांनी युक्रेनला रशियाच्या आतपर्यंत खोलवर मारा करू शकतील अशी शस्त्रे देण्यापासून रोखणे आहे.
२०१० मध्ये झालेल्या New START संधी संपण्याच्या काही आठवडे आधी रशियाने ओरेश्निक क्षेपणास्त्रे तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. ही शस्त्रसंधी अमेरिका आणि रशिया यांच्यातील शेवटची सर्वात मोठी संधी होती. यामुळे स्ट्रॅटेजिक अण्विक शस्त्रांच्या तैनातीवर अंकूश ठेवला जात होता.
गेल्या आठवड्यात बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी सांगितले होते की काही क्षेपणास्त्रे ही तैनात करण्यात आली आहेत. मात्र त्यांनी त्यांचे लोकेशन सांगण्यात आले नाही. लुकाशेंको यांनी दावा केलाय की बेलारूसमध्ये १० ओरेश्निक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात असे सांगितले होते.