Pulwama Terror Attack  
आंतरराष्ट्रीय

Pulwama Terror Attack : पाकचे नवे लष्करप्रमुख पुलवामा हल्ल्याचे प्लॅनर

मोहन कारंडे

नवी दिल्ली/इस्लामाबाद; वृत्तसंस्था : लेफ्टनंट जनरल आसीम मुनीर 29 नोव्हेंबरला निवृत्त होणार्‍या जनरल कमर जावेद बाजवा यांच्याकडून पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतील. पुलवामा (Pulwama Terror Attack) येथे भारतीय लष्करावर फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळा प्लॅन आसीम मुनीर यांनीच रचला होता. ते तेव्हा पाक गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख होते.

मुनीर हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे विरोधक मानले जातात. मुनीर यांची नियुक्ती जाहीर होताच आरिफ अल्वी रावळपिंडीहून चार्टर्ड विमानाने इम्रान खानसोबत लाहोरला दाखल झाले. इम्रान यांनी आधीच मुनीर यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. मुनीर यांची नियुक्ती नवाज शरीफ यांच्या सांगण्यावरून झाली आहे. यापूर्वी पंतप्रधान असताना नवाज शरीफ यांनीच परवेज मुशर्रफ यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती; पण नंतर मुशर्रफ यांनीच शरीफ यांचे जगणे कठीण करून सत्ता हस्तगत केली होती, हे येथे उल्लेखनीय! आता मुनीर काय करतात, ते काळच सांगेल. नवाज यांचे भाऊ शाहबाज हे सध्या पाकचे पंतप्रधान आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT