Sydney BMW accident
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका भीषण कार अपघातात गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू झाला. समनविता धारेश्वर (वय ३३) असे या महिलेचे नाव आहे. ती तिच्या पती आणि तीन वर्षांच्या मुलासह चालत जात असताना ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात समन्विथा धारेश्वर पती आणि मुलासोबत हॉर्न्सबी येथील जॉर्ज स्ट्रीटवरून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पायी जात होत्या. यावेळी रस्ता ओलांडत असताना एका किया कार्निव्हल कारने त्यांना जाण्यासाठी वेग कमी केला. त्याचवेळी, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका बीएमडब्ल्यू कारने किया कारला जोरदार धडक दिली. अपघाताचा धक्का इतका जबरदस्त होता की किया कार पार्कच्या प्रवेशद्वारातून थेट समन्विथा यांना धडकली.
अपघातानंतर समन्विथा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी बीएमडब्ल्यू चालवणारा १९ वर्षीय चालक आरोन पापाझोग्लू याला अटक केली आहे.