व्हॅटिकन सिटी : रोममधील ऑगस्टिनो गेमेली युनिव्हर्सिटी पोलिक्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी पोप लिओ मंगळवारी दाखल झाले. 
आंतरराष्ट्रीय

Pope Leo cancer surgery condition stable | पोप लिओ यांना कॅन्सर; शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर

पोप लिओ यांना कॅन्सर; शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर

पुढारी वृत्तसेवा

रोम/व्हॅटिकन सिटी : वृत्तसंस्था

कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप लिओ चौदावे (वय ७१) यांच्या उजव्या फुफ्फुसातील कर्करोगाची गाठ काढण्यासाठी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रोममधील ऑगस्टिनो गेमेली युनिव्हर्सिटी पोलिक्लिनिक रुग्णालयात मंगळवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरी रूममध्ये विश्रांती घेत आहेत, अशी माहिती व्हॅटिकन प्रशासनाकडून देण्यात आली.

डॉ. लुईगी कार्बोने आणि प्रा. स्टेफानो मार्गारीटोरा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने ही 'व्हिडीओ-असिस्टेड थोरॅसिक सर्जरी' पूर्ण केली. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेत त्यांच्या उजव्या फुफ्फुसाचा खालचा भाग (लोब) सुरक्षितपणे काढण्यात आला. तपासणीअंती ही गाठ 'पल्मोनरी अॅडेनोकार्सिनोमा' प्रकारची असल्याचे स्पष्ट झाले. ही गाठ अत्यंत प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यामुळे शरीराच्या इतर भागांत पसरली नव्हती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

व्हॅटिकनचे दैनंदिन कामकाज सुरळीत

व्हॅटिकनचे सेक्रेटरी ऑफ स्टेट कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन यांनी जगभरातील भाविकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. पोपकडून स्वाक्षरी आवश्यक असणाऱ्या औपचारिक बाबी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी कॅथॉलिक चर्चचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुरळीतपणे सुरू आहे. पुढील आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पोप पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.

१) पोप लिओ चौदावे यांच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागावर ९० मिनिटे चाललेली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

२) प्राथमिक तपासणीत फुफ्फुसाच्या त्या भागामध्ये प्राथमिक टप्प्यातील 'पल्मोनरी अॅडेनोकार्सिनोमा'

कर्करोग आढळल्याची डॉक्टरांची पुष्टी.

३) ७१ वर्षीय पोप यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांनी मंगळवारची रात्र अत्यंत शांततेत काढली.

४) २० ऑक्टोबरपर्यंत पोप यांचे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम आणि बैठका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT