Mary Millben | भारतात अशांतता पसरविण्यासाठी अमेरिकेतून फंडिंग

अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांचा आरोप; शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन
Mary Millben |
Mary Millben | भारतात अशांतता पसरविण्यासाठी अमेरिकेतून फंडिंग
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या अमेरिकेतील काही देणगीदारांकडून भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी विशिष्ट व्यक्तींना आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी केला आहे. त्यांनी तरुणांना ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) विरोधात शांततापूर्ण मार्गाने प्रतिआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.

‘एक्स’वर पोस्ट करत मेरी मिलबेन यांनी भारतीय तरुणांना ‘देशभक्त’ म्हणून संबोधित केले. या पोस्टमध्ये त्यांनी अभिजित दीपके, ‘सीजेपी’चा थेट उल्लेख करत, त्यांना अमेरिकेतील मोदीविरोधी घटकांकडून पाठबळ मिळत असल्याचा दावा केला. अमेरिकेतील विघटनकारी शक्ती भारताला कमकुवत करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यांना घाबरू नका, असे त्या म्हणाल्या.

मिलबेन म्हणाल्या, गेली २५ वर्षे भारताची सेवा करणारे, १२ वर्षे पंतप्रधान राहिलेले आणि सलग तीनवेळा निवडून आलेले तुमचे पंतप्रधान अमेरिकेतील या विघटनकारी घटकांपुढे कधीही झुकणार नाहीत. भारतात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि येथेच शिक्षण घेतलेल्या तरुणांनी ‘सीजेपी’च्या या विघटनकारी वृत्तीविरोधात शांततेने आवाज उठवावा.

अमेरिकन देणगीदारांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत मिलबेन यांनी म्हटले की, जगभरातील पुराणमतवादी नेत्यांना लक्ष्य करण्याचा या शक्तींचा ठरलेला ‘पॅटर्न’ आहे. ‘विशिष्ट देणगीदार संबंधित देशातील अशा व्यक्तींना शोधतात ज्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तिथे त्यांचे ब्रेनवॉश (रॅडिकलायझेशन) केले जाते आणि नंतर त्यांना मायदेशी पाठवून हिंसाचार, गोंधळ आणि विनाशासाठी मोठा निधी दिला जातो,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news