आंतरराष्ट्रीय

Pakistan : पुन्हा एकदा पाकिस्तानात ‘या’ महाराजांच्या पुतळ्याची विटंबना 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा एकदा पाकिस्तानातील (Pakistan) लाहोर किल्ल्यावर महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. यापूर्वीही या अश्वारुढ पुतळ्याची तीन वेळा करण्यात आली होती. विटंबना करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यातून या नकारात्मक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांकडून येत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत असणारा आणि महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी व्यक्ती 'तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान', या पाकिस्तानी (Pakistan) पक्षाची असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती पहिल्यांदा पुतळ्याचा हात तोडताना दिसते आहे, नंतर घोड्यावरील महाराजांचा पुतळाच फोडताना दिसत आहे.

पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनीदेखील हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हंटलं आहे की, "हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. हे निरक्षर लोक जगामध्ये पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी खरोखरच धोकादायक आहेत."

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशाच एका व्यक्ती महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यात त्यांचा हात तोडलेला आहे. पण, वेळीच लोकांनी त्याला थांबवलं होतं. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील सादिकाबाद येथे गणेश मंदिरावर हल्ला चढवण्यात आला होता.ट

त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात न्यायालयाच्या कठोर आदेशाने ५० जणांना अटक केली होती. भोंग शहरामध्येही जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. त्यातही सुमारे ५० जणांना अटक केली होती. मंदिरांच्या तोडफोडी या घटना लाजिवाण्या आहेत, अशी भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी व्यक्त केले होते.

पहा व्हिडीओ : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT