Pakistan drone purchase Defence ties with Turkey and China PoK drone deployment
इस्लामाबाद : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्रीची खरेदी सुरू झाली आहे.
या कारवाईनंतर पाकिस्तानने चीनकडून 'Wing Loong' प्रकारचे 30 हल्लेखोर ड्रोन (killer drones) आणि जमिनीवरून मारा करणारे लाँचर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे हे किलर ड्रोन्स Unmanned Aerial Vehicles आहेत.
ही खरेदी पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये ड्रोन ब्रिगेड तैनात करण्यासाठी केली जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून समोर आली आहे. 2021 मध्ये तुर्कीएच्या संरक्षण कंपनीसोबत झालेला करारही पाकिस्तान पुन्हा सुरु करत आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
भारत-पाकिस्तान संबंध, पाकिस्तानची वाढती ड्रोन ताकद आणि चीन-तुर्की या देशांसोबतची लष्करी भागीदारी हे सध्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर विषय बनले आहेत.
7 मे रोजी भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला होता. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्रीची खरेदी सुरू झाली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आपल्या आक्रमक क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक मोठी शस्त्र-सूची तयार केली आहे.
या यादीत जमिनीवरून प्रक्षेपण करणाऱ्या लाँचर्सचा समावेश आहे, जे रॉकेट्स, ग्रेनेड्स आणि मोठ्या गोळ्यांचा मारा करू शकतात. हे लाँचर्स चीनकडून खरेदी करण्यात येत आहेत.
पाकिस्तान केवळ चीनकडून ड्रोन खरेदी करत नाही, तर तुर्कीच्या मदतीने एक मोठी ड्रोन ब्रिगेड तयार करत असल्याची माहिती आहे.
ही ब्रिगेड पाक व्याप्त काश्मीरमध्ये तैनात केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. चीनने यासाठी उच्च-स्तरीय शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवले असून, संपूर्ण ड्रोन ताफा पुरवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
तुर्कीशी झालेल्या 2021 च्या संरक्षण करारालाही नव्याने बळ दिले जात आहे. 2025 च्या जुलैमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि तुर्की लँड सर्व्हिसेसचे प्रमुख यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे.
या कराराअंतर्गत तुर्कीएमधील घातक ड्रोन विविध संवेदनशील ठिकाणी तैनात केले जाणार आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या भागात बसवलेली चीनी बनावटीची अनेक पाळत ठेवणारी उपकरणं नष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा नव्याने पाळत ठेवणाऱ्या उपकरणांची खरेदी सुरु केली आहे.
ही उपकरणं पाक व्याप्त काश्मीरमधील झियारत टॉप आणि चिल्यारी गली या भागांमध्ये बसवली जात आहेत. याशिवाय जैसलमेर आणि बिकानेर या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागातही अशा चीनी उपकरणांची बसवणी सुरू झाली आहे.
हे तेच भाग आहेत जिथे भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयावर अचानक हल्ला केला होता – ज्याची पाकिस्तानला हल्ल्यानंतरच कल्पना आली होती.
भारताच्या आक्रमक कारवायांनंतर पाकिस्तानकडून संरक्षण यंत्रणा, ड्रोन आणि अत्याधुनिक उपकरणे खरेदीला वेग मिळाला आहे. चीन आणि तुर्कीसोबत वाढती लष्करी भागीदारी आणि पाकिस्तानच्या दहशतवादी रणनीतीत झालेला बदल भारतीय सुरक्षादृष्टीने गंभीर बाब आहे.
2010 नंतर, अमेरिकेने पाकिस्तानला F-16 विमानांच्या विक्रीवर निर्बंध घातले. 2018 मध्ये, अमेरिकेन काँग्रेसने पाकिस्तानला 8 F-16 विमानांच्या विक्रीला मंजुरी नाकारली. या निर्बंधांमुळे पाकिस्तानने चीनच्या JF-17 लढाऊ विमानांच्या निर्मितीकडे वळले.
यामुळे पाकिस्तानचे अमेरिकेवरील लष्करी अवलंबित्व कमी झाले आहे. P-3C ओरियन हे समुद्री गस्त विमान अमेरिकेने पाकिस्तानला देण्यासाठी करार केला आहे.
20 AH-1F Cobra ही हेलिकॉप्टर्स 48 मिलियन डॉलरच्या किंमतीत प्राप्त झाली आहेत. यामध्ये 12 हेलिकॉप्टर्सचे नूतनीकरण आणि 8 नवीन हेलिकॉप्टर्सचा समावेश होता.
याशिवाय एअर-टू-एअर मिसाइल्स, पाउंड बॉम्ब्स, टेल किट्स, लेझर-गाइडेड किट्स, Harpoon अँटी-शिप मिसाइल्स, Sidewinder एअर-टू-एअर मिसाइल्स, 6 Phalanx Close-In Weapons System (CIWS) साठी पाकिस्तानने अमेरिकेसोबत यापुर्वी करार केले आहेत.