Swastika symbols
अमेरिकेमधील ओरेगॉन राज्यातील शिक्षण विभागाने हिंदूच्‍या पवित्र चिन्‍ह स्‍वास्‍तिक आणि नाझी नाझी हॅकेनक्रेझ या चिन्हातील फरक अधिकृतपणे स्‍पष्‍ट केला आहे.  Representative image
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत हिंदूंचा मोठा विजय : 'ओरेगॉन'ने 'स्वस्तिक'बाबत घेतला 'हा' निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेमधील ओरेगॉन राज्यातील शिक्षण विभागाने हिंदूच्‍या पवित्र चिन्‍ह स्‍वास्‍तिक आणि नाझी नाझी हॅकेनक्रेझ या चिन्हातील फरक अधिकृतपणे स्‍पष्‍ट केला आहे. आमच्या समुदायासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. हा निर्णय भावी पिढ्यांसाठी आमच्या प्रतिकांचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने X वर एका पोस्टच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे.

स्‍वास्‍तिक समृद्धीचे प्रतीक : ओरेगॉन शिक्षण विभाग

अमेरिकेमधील ओरेगॉन राज्यातील शिक्षण विभागाने स्‍पष्‍ट केले आहे की, हुक केलेल्या क्रॉस इमेजला सामान्यतः 'स्वस्तिक' म्हटले जाते, तर नाझी आणि निओ-नाझी चिन्हासाठी योग्य संज्ञा 'हकेनक्रेझ' आहे. स्वस्तिक हा संस्कृत शब्द आहे. स्‍वातिक प्रतीक हे हिंदू , बौद्ध , यहुदी , जैन धर्म आणि काही मूळ अमेरिकन धर्म आणि संस्कृतींसह समृद्धीचे आणि नैसर्गिक जगाच्या घटकांचे प्रतीक म्हणून वापरले जाते, असेही या विभागाने स्‍पष्‍ट केले आहे.

अमेरिकेतील हिंदू समुदायाचा ऐतिहासिक विजय..!

स्‍वातिक आणि नाझी हॅकेनक्रेझ या चिन्हातील फरक अधिकृतपणे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने X पोस्‍टच्‍या माध्‍यमातून याचे स्‍वागत केले आहे. फाऊंडेशनने X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “आमच्या समुदायाचा हा ऐतिहासिक विजय! ओरेगॉनमधील आमच्या समर्थकांच्या अथक प्रयत्नांबद्दल धन्यवाद, ओरेगॉनच्या शिक्षण विभागाने नाझी हॅकेनक्रेझ आणि हिंदूसाठी असणार्‍या पवित्र स्वस्तिक यांच्यातील फरक अधिकृतपणे ओळखला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय भावी पिढ्यांसाठी आपल्या प्रतिकांचे पावित्र्य जपण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ओरेगॉमधील समर्थकांच्‍या अखंड पाठिंब्याशिवाय आणि समर्पणाशिवाय हा विजय शक्य झाला नसता. आपण आपल्या पवित्र स्वस्तिकाच्या खऱ्या अर्थाविषयी शिक्षित आणि जागरूकता पसरवत राहू या. ”

SCROLL FOR NEXT