(Pudhari File Photo)
आंतरराष्ट्रीय

Instagram Account : या युजर्सचं इन्स्टाग्राम- फेसबुक होणार बंद, काय आहे कारण?

१६ वर्षांखालील मुलांसाठी 10 डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

पुढारी वृत्तसेवा

Instagram Account : मुलांना सोशल मीडियापासून कसे लांब ठेवावे, हा प्रश्‍न आज जगभरातील पालकांसमोर आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) अतिवापरामुळे मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येत आहे. यावर उपाय योजना म्‍हणून ऑस्‍ट्रेलियात नवा ऑनलाईन सुरक्षा कायदा अस्‍तित्‍वत आला आहे. हा नवा नियम १० डिसेंबर पासून लागू होणार आहे. पालकांच्या संमतीशिवाय १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास राष्ट्रीय स्तरावर बंदी घालणारा हा जगातील पहिला कायदा ठरला आहे.

लहान मुलांची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद

ऑस्ट्रेलियाच्या नव्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह टिकटॉक आणि लवकरच देशातील अल्पवयीन युजर्सची खाती बंद होणार आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्म्सना ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे ₹२७० कोटी) पर्यंतचा दंड होऊ शकतो.

खाते बंद होण्‍यापूर्वी युजर्संना मिळणार सूचना

रॉयटर्सच्‍या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरील मुलांची खाते कायमस्‍वरुपी काढून टाकण्यापूर्वी प्रभावित किशोरवयीन युजर्सना Notifications पाठवतील. यासाठी तीन पर्याय दिले जातील, यामध्‍ये डेटा डाउनलोड करणे: आपले सर्व प्रोफाइल डेटा डाऊनलोड करणे, प्रोफाइल गोठवणे : प्रोफाइल तात्पुरते निष्क्रिय करणे आणि खाते पूर्णपणे बंद करण्‍याचा समावेश आहे.

एआय-आधारित यंत्रणेचा होणार वापर

युजर्सना ओळखपत्रे अपलोड करण्याऐवजी मेटा, टिकटॉक, आणि Snapchat यांसारख्या कंपन्या एआय-आधारित यंत्रणा वापरणार आहेत. या सिस्टीम युजर्सच्या लाईक्स , कमेंट्स आणि सहभागाच्या पद्धतींवरून त्यांचे वय अंदाजित करतील.एखाद्या युजरला वाटले की त्यांना चुकीच्या पद्धतीने अल्पवयीन म्हणून घोषित केले गेले आहे, तर ते वयाची पडताळणी करणाऱ्या ॲप्सद्वारे अपील करू शकतात. हे ॲप्स वयाची पुष्टी करण्यासाठी सेल्फीचे विश्लेषण करतात.फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसाठी वयाची पडताळणी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या 'योटी' (Yoti) कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे की, 'युजर्स नवीन पद्धतींशी जुळवून घेईपर्यंत या प्रक्रियेला स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.'

जागतिक स्तरावर एक आदर्श निर्माण करू शकतो

ऑस्ट्रेलियाच्या या नवीन कायद्यानुसार, ज्या १६ वर्षांखालील युजर्सना पालकांची संमती नसेल, त्यांची खाती सोशल मीडिया कंपन्यांना ब्लॉक करावी लागणार आहेत. ऑस्ट्रेलियातील कायदेकर्त्यांना माहिती देताना टिकटॉकने स्‍पष्‍ट केले होते की, त्यांच्याकडे १३ ते १५ वयोगटातील सुमारे दोन लाख युजर्स आहेत. टिकटॉकने अल्पवयीन युजर्सना ओळखण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी नवीन साधने विकसित करत असल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील उर्वरित २० दशलक्ष सोशल मीडिया युजर्सवर या बदलाचा त्वरित कोणताही मोठा परिणाम होणार नाही. परंतु, तज्ञांचे मते हा कायदा जागतिक स्तरावर एक आदर्श निर्माण करू शकतो. २०२६ मध्ये इतर देशही याचे अनुकरण करतील. यामुळे ऑस्ट्रेलिया अल्पवयीनांसाठी सोशल मीडिया वापरावर औपचारिकपणे मर्यादा घालणारा जगातील पहिला देश बनणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT