प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Online Crime Network |भयंकर..! ऑनलाइन 'रेप नेटवर्क'चा पर्दाफाश; जोडीदारांना अंमली पदार्थ देऊन अत्याचार करणारा नराधम जेरबंद

Online Crime Network Exposed | पोलंडमधील सरकारी वकील कार्यालयाने केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Online Crime Network Exposed

लुब्लिन (पोलंड): येथे एक धक्कादायक विकृती समोर आली आहे. आपल्या जोडीदाराला गुंगीकारक अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि या क्रूर कृत्याचे ऑनलाइन चित्रीकरण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विकृतीचा कळस म्हणजे काही पुरुष एकमेकांना आपल्या जोडीदारांना अंमली पदार्थ देऊन (गुंगीचे औषध देऊन) त्यांच्यावर बलात्कार कसा करायचा, याचे धडे देत असल्याची धक्कादायक माहिती 'ऑनलाइन बलात्कार-नेटवर्क'चा पर्दाफाशामुळे उजेडात आली आहे.

धक्कादायक खुलाशानंतर कारवाई

'सीएनएन' दिलेल्या वृत्तानुसार, पुरुष आपल्या जोडीदारांना अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार कसा करायचा, याचे धडे एकमेकांना ऑनलाइन नेटवर्कच्या माध्यमातून देत असल्याचे समोर आले होते. या धक्कादायक खुलाशानंतर पोलंडमधील लुब्लिन येथील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

नराधमला तीन महिन्‍यांची कोठडी

पोलंडमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव 'पियत्र' असे आहे. CNN ने आपल्या तपासादरम्यान त्याला याच टोपणनावाने संबोधित केले होते. स्थानिक प्रशासनाने संशयिताच्या नावाचा अधिकृत खुलासा केला नसला तरी, एका व्यक्तीला बलात्काराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले असून त्याला तीन महिन्यांची कोठडी सुनावण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

काय आहेत आरोप?

आरोपीवर पोलंडमधील फौजदारी संहितेच्या कलम १९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अशा बलात्काराचा समावेश होतो जिथे पीडित व्यक्ती अत्यंत असुरक्षित असते किंवा प्रतिकार करण्यास असमर्थ असते. सरकारी वकिलांनी स्पष्ट केले आहे की, आरोपीने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. या प्रकरणातील आरोप दोषी आढळल्यास नराधमाला ३ ते २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

तपासासाठी बनवले बनावट प्रोफाइल

CNN च्या पत्रकार सास्क्या व्हँडोरने आणि नियाम केनेडी यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अश्लील वेबसाइट्स आणि ग्रुप चॅट्सवर बनावट प्रोफाइल्स तयार केली होती. तिथे त्यांना अशा अनेक क्लिप्स आढळल्या. यामध्ये बेशुद्ध महिलांवर अत्याचार केले जात असल्याचे निष्पन्न झाले.

पुरावे दिल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई

'टेलिग्राम'वरील अशाच एका गुप्त ग्रुपमध्ये हा आरोपी सामील होता, जिथे जवळपास १,००० सदस्य जोडीदारांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याबाबत चर्चा करत असत. आरोपीने पत्रकारांच्या बनावट प्रोफाईलशी संवाद साधताना आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो देखील शेअर केले होते. CNN ने पोलंडला जाऊन या व्यक्तीची ओळख पटवली आणि गेल्या महिन्यात सर्व पुरावे पोलिसांच्या हवाली केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT