Oil Price Hike pudhari
आंतरराष्ट्रीय

Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ... इराणनं पुन्हा होर्मुझ केले ब्लॉक; युएस ऊर्जा सचिवांनी दिला इशारा

Anirudha Sankpal

Oil Price Hike Iran US Conflict : इराणने होर्मुझ सामुद्रधूनी पुन्हा ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळं जागतिक भूराजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. इराणने होर्मुझमधून पास होणाऱ्या तेल टँकरवर गोळीबार देखील केला होता. त्यामुळं टेल टँकर्सना माघारी फिरावं लागलं होतं.

दरम्यान ब्रेंट क्रूड ऑईलची जागतिक बाजारपेठेतील प्रती बॅरेल किंमत ही ७ टक्क्यांनी वाढली असून ती आता ९६.८८ डॉलर प्रती बॅरेल इतरी पोहचली आहे. याचबरोबर युएस वेस्ट टेक्सास इंटरमेडिएट क्रूड देखील ७ टक्क्यांनी वाढून ते ९०.३३ डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहचलं.

ग्राहकांची चिंता वाढली

मध्य पूर्व आशियातील टेन्शन ऊर्जा बाजार आणि ग्राहकांची चिंता वाढवत आहे. युएसमधील गॅसोलीन (पेट्रोल) चे द हे राष्ट्रीय स्तरावर ४.५ डॉलर प्रती गॅलन पोहचले आहेत. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी या वर्षी गॅसोलीनचे दर ३ डॉलरच्या खाली येणार नाहीत असा इशारा देखील दिला आहे. असं असलं तरी त्यांनी या वर्षात पुढं याचे दर कमी होण्याची शक्यता देखील फेटाळून लावलेली नाही.

स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये वाढत्या तणावाचा परिणाम हा आर्थिक बाजारावर देखील दिसत आहे. आठवड्याच्या सुरूवातीला Dow futures 451 अंकांनी तर S&P 500 आणि Nasdaq हे दोन्ही जवळपास ०.८ टक्क्यांनी पडले आहेत.

होर्मुझमध्ये गोळीबार, शिप जप्त

अमेरिकेने विश्वास घात केल्याचा आरोप करत इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा बंद केली. त्यांनी यापूर्वी होर्मुझमधील दळणवळण मुक्त करण्याचे संकेत दिले होते.

इराणने भारताच्या ऑईल टँकरवर गोळीबार केल्यानंतर परिस्थिती पुन्हा चिघळली. रविवारी अमेरिकेने इराणचा झेंडा असलेल्या काही व्हेसल्सवर अनेक राऊंड गोळीबार गेला. ही जहाजे अमेरिकेचे ब्लॉकेड पास करण्याचा प्रयत्न करत होती. युएस सेंट्रल कमांडेने इराणची तौस्का ही शिप जप्त केली आहे असा दावा देखील केला.

अमेरिकेचा इशारा, इराणचेही प्रत्युत्तर

यानंतर इराणच्या लष्कराने देखील अमेरिकेची ही कृती शसस्त्र चाचेगिरी आहे असं सांगत याचे त्वरित चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं जाहीर केलं.

व्हेसल ट्रॅकिंग डेटानुसार या सर्व घडामोडीनंतर शिपिंग हालचाली ठप्प झाल्या आहेत. रविवारी कोणत्याही व्हेसलने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार केल्याचे वृत्त नाही. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना झाल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी जर करार झाला नाही तर अमेरिका बुधवारनंतर शस्त्रसंधी वाढवण्याची शक्यता नाही असे देखील वक्तव्य केलं आहे.

चर्चा होणार की फिसकटणार?

सीएनएनच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचे शिष्ठमंडळ हे गुरूवारी पाकिस्तानमध्ये दाखल होईल. विशेष म्हणजे इराणने सध्याच्या घडीला तरी या वाटाघाटींच्या चर्चेत सहभाग नोंदवणार नसल्याचं सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT