आंतरराष्ट्रीय

Nobel Prize 2024 : फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचा फिजिक्स (पदार्थविज्ञान) नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना ‘कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन शिक्षण सक्षम करणाऱ्या पायाभूत शोधांसाठी’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला. रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ फिजिक्सच्या सदस्यांची आज बैठक झाली, त्यामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. (The Nobel Prize Physics)

सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी दोघांनाही शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल पुरस्कार म्हणजे काय?

पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात नोबेल पुरस्कार सुरुवातीला दिला जात होता. १९६८पासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरुस्कार दिला जाऊ लागला. तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिले तर अर्थशास्त्रातील पुरस्कार हा नोबेल पुरस्कार नाही, हा पुरस्कार स्वीडनची मध्यवर्ती बँक Sveriges Riksbank देते आणि या पुरस्काराचे नाव The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel असे आहे. विज्ञानातील पुरस्कार हे या वर्षांतील मानवजातीच्या लाभासाठीच्या सर्वोत्तम संशोधनला दिले जाते. तर शांततेचा नोबेल पुरस्कार हा देशांदेशांतील मैत्री वाढवण्यासाठी, शांततेच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांना दिला जातो.

नोबेल पुरस्कार का दिला जातो?

स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्युपत्रानुसार या पुरस्काराचे गठन केले. त्यांनी त्यांची संपत्ती यासाठी दिलेली आहे. नोबेल स्वीडनमधील रसायनशास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योगपती होते. डायनामाईटचा शोध त्यांनी लावला होता. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ला झाला तर मृत्यू १८९६ला झाला. त्यानंतर पहिला नोबेल पुरस्कार १० डिसेंबर १९०१ला देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT