Nepal flash flood China warning: चीनने शुक्रवारी तिबेट आणि नेपाळ भागात सुरू असलेलं आपलं बचाव कार्य अचानक थांबवलं असून सरकारी मीडियानुसार या भागातील एक बॅरियर लेक ओव्हरफ्लो झाल्यानं अचानक पूर येणाचा धोका निर्माण झाली आहे. त्यामुळं चीनने आपले बचाव पथक मागे बोलवण्याचा आदेश दिला आहे.
चीनच्या सरकारी चॅनल सीसीटीव्ही ने सांगितलं की अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सस्पेंड करण्याचे आणि बचाव पथकाला मागे बोलवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व बचाव पथकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि पुढचा आदेश येईपर्यंत वाट पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी आधीच प्रभावित क्षेत्रात पोहचले आहेत त्यांना तिथून एक किलोमीटर मागे हटण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चीनने गुरूवारी इशारा दिला होता की बुधवारी जो अचानक पूर आला त्यानंतर भोटे कोशी नदी एक बॅरियर लेक झाली आहे. हा तलाव कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. चीनने जर हा बॅरियर लेक तुटला तर पुढच्या ७२ तसात अजून एक मोठा पूर येऊ शकतो असा इशारा देखील दिला आहे.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या या पूरात जवळपास ४६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६६७ नागरिक अजून बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. बेपत्ता लोकांमध्ये १२७ नागरिक हे नेपाळचे आहेत. तिबेटमधील सरकारी मीडियाने गुरूवारी सायंकाळी जवळपास ५५८ लोकं बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.
यात २६० परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं सांगितलं. तिबेटमध्ये तीन लोकांच्या मृत्यूची देखील माहिती दिली आहे. नेपाळप्रमाणे चीनचे अधिकारी हे नियमित स्वरूपात आकडेवारी प्रसिद्ध करत नाहीये.