Axiom Mission 4 Microgravity indicator Zero-gravity toy Joy the swan India Poland Hungary swan importance spaceflight tradition Astronaut tradition Zero-G indicator history
नवी दिल्ली/फ्लोरिडा : अवकाशात मानव पाठवण्याची परंपरा जितकी वैज्ञानिक आहे, तितकीच ती मानवी भावनांनीही परिपूर्ण आहे. अलीकडील अॅक्सिओम-4 (Axiom-4) मोहिमेदरम्यान याचं आणखी एक सुंदर उदाहरण पाहायला मिळतंय — ‘जॉय’ नावाचा एक छोटासा सॉफ्ट टॉय हंस (plush swan) जो या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा एक खास भाग ठरणार आहे.
अॅक्सिओम-4 मोहिमेच्या अंतराळयानात, स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून, पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर एक अनोखी गोष्ट घडणार आहे — ‘जॉय’ हा सॉफ्ट टॉय हंस अंतराळयानात तरंगू लागेल. तो तिथे कोणत्याही वैज्ञानिक उपकरणासाठी नसेल, पण त्याचे महत्त्व अपार आहे.
या मोहिमेतील प्रमुख, अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन, भारतीय वैमानिक गट कॅप्टन शुभांशु शुक्ला, पोलंडचे स्लावोश उझ्नान्स्की-विश्नेव्स्की आणि हंगेरीचे टिबॉर कापू यांनी ‘जॉय’ या हंसाला त्यांच्या मोहिमेचा zero-gravity indicator म्हणून निवडलं आहे.
मायक्रोग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षण नसलेल्या अवस्थेत पोहोचल्याचं पहिले दृश्य संकेत म्हणजे zero-gravity indicator. अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचताच, ही हलका वस्तू — एक खेळणे — यानात तरंगू लागतो. ही परंपरा 1961 मध्ये जगातील पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांनी पहिल्यांदा सुरू केली. त्यांनी एक छोटं बाहुलं सोबत नेलं होतं.
या सॉफ्ट टॉय हंसाचं नाव 'जॉय' (आनंद) आहे, आणि तो केवळ एक खेळणी नसून सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ घेऊन येतो. पेगी व्हिटसन म्हणाल्या की, ‘जॉय’ विविध राष्ट्रांच्या एकत्र येण्याचं प्रतीक आहे. भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांच्या अंतराळ मोहिमेत परतण्याच्या इच्छेचं प्रतिक आहे.”
गट कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी सांगितलं की, “भारतीय संस्कृतीत हंस हा देवी सरस्वतीचे वाहन आहे — तो ज्ञान, शुद्धता आणि विवेकाचं प्रतीक आहे.
त्याच्यामध्ये दूध आणि पाणी वेगळं करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे एकप्रकारे चांगलं आणि वाईट यामधील फरक ओळखण्याची क्षमता. ‘जॉय’ हे केवळ एक खेळणं नाही, तर ही मिशनच्या उद्दिष्टाचं प्रतिबिंब आहे – ज्ञानाची साधना, हेतूची स्पष्टता आणि दबावाखाली शांतता.”
पोलंडसाठी हंस हा संकटात टिकून राहण्याचं (resilience) प्रतीक आहे, तर हंगेरीसाठी तो gracefulness — सौंदर्य आणि समतोल याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे, ‘जॉय’ विविध संस्कृतींचं आणि मूल्यांचं एकत्रित रूप घेऊन अंतराळात जात आहे.
रशियन अंतराळवीरांनी आपल्या लहान मुलांनी दिलेली बाहुली किंवा खेळणी यांना zero-g indicator म्हणून नेण्याची परंपरा ठेवली आहे. स्पेसएक्स ड्रॅगन आणि बोईंग स्टारलाइनर यानांच्या मिशनमध्ये ही परंपरा पुन्हा जगभर पसरली. NASA च्या अर्टेमिस मिशनसुद्धा याला पुढे चालवत आहेत.
‘जॉय’ हंस फक्त एक सॉफ्ट टॉय नाही, तर एका अंतराळ मोहिमेच्या मानवीतेच्या बाजूचं प्रतीक आहे. विविध संस्कृती, मूल्यं आणि राष्ट्रं एकत्र येऊन जेव्हा अंतराळात झेप घेतात, तेव्हा असे छोट्या पण भावपूर्ण गोष्टी त्या मिशनचं आत्मिक रूप दाखवतात.
अॅक्सिओम-4 मध्ये ‘जॉय’ हेच रूप घेऊन पृथ्वीबाहेर झेपावणार आहे — आनंदाचा, एकतेचा आणि ज्ञानाचा संदेश घेऊन.