'नासा'च्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी बॅटमॅनच्या वेषभूषेत अंतराळात हॅलोविन साजरा केला.  x photo
आंतरराष्ट्रीय

NASA Halloween : बॅटमॅनचा अवतार अन् झिरो ग्रॅव्हिटीत धम्माल! अंतराळात NASAच्या अंतराळवीराने साजरा केला अनोखा 'हॅलोविन'

NASA astronaut Batman Halloween in space : अंतराळवीरांमध्ये सुपरहिरो कॉस्च्युमची भुरळ नेहमीच पाहायला मिळते

पुढारी वृत्तसेवा

NASA astronaut Batman Halloween in space : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी बॅटमॅनच्या वेषभूषेत अंतराळात हॅलोविन साजरा केला. त्यांनी थेट अंतराळातून बॅटमॅनच्या पोशाखातील स्वतःचा फोटो शेअर करत सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा सुपरहिरो अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

बॅटमॅनचा पोशाख घालून अंतराळात हॅलोविन साजरा

हॅलोविन हा ३१ ऑक्टोबर रोजी पाश्चात्त्य देशांमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे. या सणानिमित्त मृत आत्म्यांच्या स्मरणार्थ लोक भूतांसारखी विचित्र वेशभूषा करतात आणि मुले घरा-घरांमध्ये खाऊ गोळा करतात. नासाच्या अंतराळवीराने बॅटमॅनचा पोशाख घालून अंतराळात हॅलोविन साजरा केला

पेगी व्हिटसन यांनी कोणता मेसेज दिला...

पेगी व्हिटसन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बॅटमॅनचा ड्रेस घातलेला फोटो पोस्ट करत लिहिले, "सर्वांना हॅलोविनच्या हार्दिक शुभेच्छा! अंतराळात सुपरहिरोची थीम आणि पोशाख निवडणे नेहमीच लोकप्रिय ठरते आणि त्यामागची कारणे तर अगदी उघड आहेत."

अंतराळवीरांमध्ये सुपरहिरो कॉस्च्युमची भुरळ

अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात सुपरहिरोसारखे तरंगणे सोपे असल्याने अंतराळवीरांमध्ये सुपरहिरो कॉस्च्युमची भुरळ नेहमीच पाहायला मिळते, असा हलकाफुलका संदेशही त्यांनी आपल्या या पोस्टमधून दिला आहे.

नेटिझन्सकडून मजेशीर कमेंट्स

व्हिटसन यांच्या या खास 'बॅटमॅन' लूकमुळे यंदाच्या हॅलोविन उत्साहाला एक वेगळाच अंतराळ-रंग चढला असून जगभरातून त्यांच्या या फोटोवर नेटिझन्सकडून मजेशीर कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT