International Space Station news
२०३० मध्ये ISS स्पेस स्टेशन नष्ट होणार File Photo
आंतरराष्ट्रीय

२०३० मध्ये NASA चे 'स्पेस स्टेशन' नष्ट होणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) नष्ट झाल्यानंतर नासा एलन मस्क यांच्या 'SpaceX'ची मदत घेणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक खाली उतरवण्यास नासाने मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची निवड केली आहे. या संदर्भातील वृत्त 'बीबीसी'ने दिले आहे.

ISS 'डिऑर्बिट व्हेईकल'साठी 'SpaceX' ची निवड

नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे २०३० मध्ये परिचालन जीवन संपल्यानंतर ते नियंत्रित पद्धतीने खाली उतरवण्यासाठी सुरक्षित आणि जबाबदार डीऑर्बिटसाठी तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी NASA ने एलन मस्क यांच्या 'SpaceX' कंपणीची निवड केली आहे. ते यू.एस. डिऑर्बिट व्हेईकल विकसित करण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी काम करेल. स्पेस एक्स कंपनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला डिऑर्बिट करण्याची क्षमता प्रदान करेल आणि लोकसंख्या असलेल्या भागात पडण्याचा धोका टळला जाईल, असे नासाने त्यांच्या वेबसाईटवरील माहितीत म्हटलं आहे.

स्पेस स्टेशन ९० मिनिटांत ४०० किमी प्रदक्षिणा घालते

कॅलिफोर्निया-आधारित कंपनी पुढील दशकाच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागरात 430 टन परिभ्रमण प्लॅटफॉर्म ढकलण्यास सक्षम वाहन तयार करेल. या कामासाठी ८४३ मिलीयन डॉलरचा करार बुधवारी (दि.२६ जून) जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला घटक १९९८ रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले, त्यानंतर २००० सालापासून सातत्याने क्रू ऑपरेशन्स सुरू आहेत. हे स्टेशन दर ९० मिनिटांनी अंतराळात ४०० किमी (२५० मैल) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. हे अंतराळस्थानक हजारो वैज्ञानिक प्रयोगांचे घर आहे. मानवांमधील वृद्धत्वाच्या प्रक्रियेपासून नवीन प्रकारच्या सामग्रीच्या सूत्रापर्यंत सर्व प्रकारच्या घटनांचा तपास या स्थानकांतून केला जातो.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाविषयी (ISS)...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे.

SCROLL FOR NEXT