donald trump - elon musk Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Musk vs Trump epstein files | मस्क-ट्रम्प वाद पुन्हा पेटणार; 'त्या' सेक्स स्कँडल प्रकरणात एकही अटक झाली नसल्याचे मस्क यांचे ट्विट

Musk vs Trump epstein files | एपस्टिन प्रकरणावरील पोस्टमुळे खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Elon Musk vs Donald Trump epstein files

वॉशिंग्टन : कधीकाळी एकमेकांचे कट्टर समर्थक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त उद्योजक इलॉन मस्क यांच्यातील संबंध आता खूपच ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी "Big, Beautiful Bill"ला मंजुरी दिल्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी फारकत घेतली आहे.

तेव्हापासून दोघांमध्ये सोशल मीडियावरून सतत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता मस्क यांनी स्वतःचा पक्षच काढला आहे.

आता मस्क यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी "जेफ्री एपस्टिन प्रकरणात आजवर किती अटक झाली? असा सवाल करत "अधिकृत अरेस्ट काउंटर" शेअर करत त्यावर शुन्य नंबर दाखवले आहेत.

म्हणजे या प्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही, अशी टीका अप्रत्यक्षपणे करत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मस्क?

मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, "What's the time? Oh look, it's no-one-has-been-arrested-o'clock again," (म्हणजेच: "वेळ काय झाली आहे? अरे पाहा, ही तर पुन्हा 'कोणीही अटकेत नाही' अशी वेळ झाली आहे!") अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यासोबतच त्यांनी एक चित्र शेअर केले ज्यात लिहिले होते: "The Official Jeffrey Epstein Arrest Counter: 0 0 0 0"

न्याय विभाग आणि एफबीआय अहवालानंतर मस्क यांची प्रतिक्रिया

ज्या दिवशी DOJ (डिपार्टमेंट ऑफ जस्टिस) आणि FBI ने आपला तपास अहवाल प्रसिद्ध केला, त्यानंतर मस्क यांनी ही पोस्ट केली आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, एपस्टिनच्या मृत्यूमध्ये हत्या किंवा कोणत्याही बड्या व्यक्तींना ब्लॅकमेल केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तसेच, एपस्टिनकडे कोणताही "क्लायंट लिस्ट" असल्याचेही नाकारण्यात आले आहे.

मस्क यांनी आधीही केले होते ट्रम्प यांच्यावर आरोप

इलॉन मस्क यांनी याआधीच आरोप केला होता की, डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टिन प्रकरणातील काही सीलबंद कागदपत्रांमध्ये आहे. त्यामुळे ही नवीन पोस्ट केवळ सामान्य टिप्पणी नसून ट्रम्प यांच्यावरील एका सूचक आणि संभाव्य गंभीर आरोपाचाही भाग असल्याचे दिसते.

एपस्टिन प्रकरण नेमकं काय आहे?

जेफ्री एपस्टिन हा एक धनाढ्य फिनान्सियर होता जो अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमध्ये अडकला होता. 2019 साली तो तुरुंगात मृतावस्थेत आढळून आला. अनेकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

मात्र, अलीकडील DOJ आणि FBI च्या निष्कर्षानुसार त्याच्या मृत्यूमध्ये कोणतीही षड्यंत्राची चिन्हे नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मस्क यांच्या 'अटक काऊंटर' पोस्टने पुन्हा एकदा एपस्टिन प्रकरण, ट्रम्प यांच्यावरील संशय आणि सरकारी यंत्रणांवरील प्रश्नचिन्ह यांचा त्रिकोण चर्चेत आणला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामागचा उद्देश आणि त्याचे राजकीय परिणाम यावर चर्चा तापली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT