'मंकी पॉक्स' जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर File Photo
आंतरराष्ट्रीय

Monkeypox | 'मंकी पॉक्स'चा संसर्ग कशामुळे होतो; जाणून घ्या लक्षणे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 'मंकी पॉक्स' या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे. मंकीपॉक्स (एमपॉक्स) विषाणूने काँगो, केनिया, रवांडा आणि युगांडा यासह दहा आफ्रिकन देशांमध्ये कहर केला असून या आजाराच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या आपत्कालीन बैठकीत सांगण्यात आले.

(Monkeypox)

हा विषाणू सर्व आफ्रिकन देशांमध्ये आणि जगातील इतर देशांमध्येही पसरण्याची भीती संघटनेला वाटते. या आजाराने आणीबाणी घोषित होण्याची दोन वर्षांत ही दुसरी वेळ आहे. काँगोमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून, शेजारील बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांतही रुग्ण आढळू लागले आहेत.

'मंकी पॉक्स' हा देवीसारखा विषाणूजन्य आजार असून, फ्लूसारखी लक्षणे आहेत. शरीरावर पू भरलेल्या जखमा होतात. काँगोसह आफ्रिकेत आतापर्यंत 'मंकी पॉक्स'चे १७ हजारांवर रुग्ण आढळले आहेत. मास्कचा उपयोग नाही पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस व एचआयव्ही तज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी पुढारीला सांगितले की, मंकी पॉक्सची तुलना कोरोनाशी करता येत नाही.

थुंकी किंवा श्वासातून किंवा कफातून हा आजार पसरण्याची शक्यता कमी आहे. याचाच अर्थ कोणताही मास्क लावून मंकी पॉक्सपासून संरक्षण मिळत नाही. सध्या मंकी पॉक्सची साथ ही फक्त पाच आफ्रिकन देशांमध्ये आहे. त्यातही मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. २०२२ मध्ये मी लैंगिक संबंधांतून पसरणारा एकवीसव्या शतकातील आजार म्हणून मंकी पॉक्सचे वर्णन केले होते.

कारण या आजाराच्या शंभर रुग्णांपैकी ९९ टक्के पुरुषांना लैंगिक संबंधांतून या आजाराचा संसर्ग होतो. या आजाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. मात्र, यावर जिनोस आणि बावरीयन नॉर्डिक लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करते. भारताने आता आपली लस निर्मितीची क्षमता या आजाराच्या बाबतीत वापरली पाहिजे, असे मत देखील डॉ. गिलाडा यांनी व्यक्त केले.

लक्षणे

  1. मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि सुज लेल्या लिम्फ नोड्स यांचा समावेश होतो. यानंतर पुरळ उठतात. पुरळ उठायला चेहऱ्यापासून सुरू होतात आणि संपूर्ण शरीरात उठतात. डागांपासून मुरुमांपर्यंत पुरळ विकसित होते, जे शेवटी खरुज बनतात. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे राहतात.

  2. मंकीपॉक्सबाबत कोणतेही प्रकरण देशात आया आले नाही. याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना केंद्र सरकाराकडून लागू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी केले.

  3. हा आजार संसर्गजन्य असून पूर्वीच्या देवी अजारासारखा आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त इतर देशांत रुग्ण नसले तरी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांकडून हा आजार पसरण्याची भीती आहे. हा आजार खोकल्यातूनही पसरू शकतो. तसेच लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT