Miss World 2025 Finale India's Nandini Gupta
हैदराबाद : भारतात मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेची सुरुवात 7 मे 2025 रोजी झाली होती आणि आज, 31 मे 2025 रोजी हैदराबादच्या HITEX कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा होणार आहे.
यंदा 108 देशांतील सौंदर्यवतींनी या जागतिक स्पर्धेत भाग घेतला आहे. 25 दिवस चाललेल्या या स्पर्धेचा भव्य समारोप समारंभ होत आहे. 2024 मधील विजेती क्रिस्टिना पायझकोव्हा (चेक रिपब्लिक) आपली उत्तराधिकारी निवडणार आहे.
या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी 21 वर्षांची नंदिनी गुप्ता सेमीफायनल्समध्ये पोहोचली आहे.
भारतामध्ये: SonyLIV अॅप किंवा वेबसाइटवर सायं. 6:30 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण उपलब्ध.
जगभरातील प्रेक्षकांसाठी: www.watchmissworld.com या अधिकृत पे-पर-व्ह्यू प्लॅटफॉर्मवर HD क्वालिटीमध्ये लाइव्ह पाहता येणार.
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत नंदिनी गुप्ता ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. नंदिनीचा जन्म 12 सप्टेंबर 2003 रोजी राजस्थानच्या कोटा शहरात झाला.
तिने सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर मुंबईतील लालाजी लाजपतराय कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली.
नंदिनीच्या कुटुंबात तिचे शेतकरी वडील, गृहिणी आई आणि एक लहान बहीण आहे. तिचे लहानपण शेतात काम करण्यात आणि खेळण्यात व्यतीत झाले आहे.
तिच्या जीवनातील प्रेरणास्त्रोत म्हणून तिने उद्योगपती रतन टाटा आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचा उल्लेख केला आहे.
नंदिनी गुप्ता हिने 2023 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला आणि त्यानंतर 2025 च्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली.
या स्पर्धेत ती 'टॉप मॉडल चॅलेंज'मध्ये एशिया-ओशिनिया क्षेत्रातून विजेती ठरली, ज्यामुळे तिच्या कौशल्यांचे आणि सौंदर्याचे जागतिक स्तरावर कौतुक झाले.
नंदिनी गुप्ता हिने 'प्रोजेक्ट एकता' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना समाजात स्वीकार करण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यातून काम केले जाते.
रीता फारिया (1966) – पहिली आशियाई Miss World
ऐश्वर्या राय (1994)
डायना हेडन (1997)
युक्ता मुखी (1999)
प्रियंका चोप्रा (2000)
मानुषी छिल्लर (2017)
1951 मध्ये यूकेमध्ये सुरू झालेली ही स्पर्धा सौंदर्याच्या व्याख्या विस्तारत गेली. आता Miss World ही केवळ सौंदर्य स्पर्धा न राहता, ‘Beauty with a Purpose’ या सामाजिक संदेशासाठी ओळखली जाते.