France 24 report on Pakistan madrasa child exploitation mullahs abuse children
नवी दिल्ली : पाकिस्तानातील मदरशांमध्ये मोफत धार्मिक शिकवण देण्याच्या नावाखाली हजारो अल्पवयीन मुलांवर मौलवींनीच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. फ्रेंच मीडिया हाऊस 'फ्रान्स 24'च्या माहितीपटातून या भयानक सत्याचा खुलासा झाला आहे.
या माहितीपटात पाकिस्तानातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रत्येक घटनेचे तपशीलवार वर्णन केले आहे. मुलांनी सांगितले की इस्लामिक शिक्षण देण्याची जबाबदारी असलेले मौलवी त्यांच्यावर बलात्कार करतात.
जरी या शाळा (मदरसे) सामान्य पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांना मोफत धार्मिक आणि इस्लामिक शिकवणी देण्याचा दावा करत असल्या तरी, येथे त्यांच्या लैंगिक छळाची आणि लैंगिक हिंसाचाराची एक पद्धतशीर संस्कृती विकसित झाली आहे, असे या माहितीपटात म्हटले आहे.
या माहितीपटामुळे जगभरात खळबळ माजली असून दहशतवादी कारवायांना पाठिंबा आणि दहशतवाद्यांना पोसल्यामुळे आधीच जगभरात नाचक्की झालेल्या पाकिस्तानची जागतिक स्तरावर होती नव्हती तेवढी लाजही गेली आहे.
'फ्रान्स 24'च्या रिपोर्टमध्ये अनेक साक्षीदारांच्या अनुभवाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात मुलांनी सांगितेल आहे की, ज्या धर्मगुरूंनी त्यांना धार्मिक मूल्ये शिकवायची होती त्यांनीच त्यांच्यावर बलात्कार केला. वारंवार लैंगिक छळ केला.
गावातील सर्व मुले मदरशांमध्ये बलात्कार होण्याच्या धोक्याबद्दल बोलत होती. मला वाटले नव्हते की माझ्यासोबत असे काही घडेल असे 14 वर्षीय हसन या पीडित मुलाने सांगितले. त्या मुलाने त्याच्यावर मुल्लाने कसा बलात्कार केला तेच सांगितले आहे.
'फ्रान्स 24' या चॅनेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हसन याने सांगितले आहे की, त्याच्या मदरशाच्या मुख्याध्यापकाने त्याला घर स्वच्छ करण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. मी त्याच्या मोटरसायकलवर बसलो आणि आम्ही त्याच्या घरी निघालो.
घरी पोहचताच तो खोलीत आला, त्याने दार बंद केले. त्यांनी मला खाली पाडले. माझी पँट बळजबरीने काढून टाकली. आणि मग त्याने माझ्याशी भयानक कृत्ये केली. मला रडू आवरत नव्हते, पण त्याने माझे काहीही ऐकले नाही," अशी आपबिती त्या मुलाने सांगितली आहे.
याशिवाय, एका मदरशात शिकणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, "मी बऱ्याच काळापासून शिक्षकांचा हा प्रकार पाहत आहे. एकदा मी पाहिले की खोलीची खिडकी उघडी होती आणि शिक्षक कपडे काढून एका मुलावर झोपले होते.
म्हणून मी विचार केला की जर मदरशांमध्ये असे घडत असेल तर ते योग्यच असेल, म्हणून मी इतर मुलांसोबतही ते करायला सुरुवात केली. मग जेव्हा मी मदरशातून बाहेर पडलो आणि घरी पोहोचलो तेव्हा मी घरीही तेच करायला सुरुवात केली. नंतर मला कळले की हे सर्व करणे चुकीचे आहे."
पाकिस्तानी मदरशांबद्दल असे सत्य समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 मध्ये, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनेही मदरशांमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा खुलासा केला होता. 2017 मध्ये असोसिएटेड प्रेसने पाकिस्तानच्या मदरशांमध्ये लैंगिक शोषणाची असंख्य प्रकरणे उघडकीस आली.
त्या अहवालात, ज्यामध्ये पोलिस रेकॉर्ड आणि पीडित, कुटुंबे, धर्मगुरू, मदत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा वापर करण्यात आला होता.
त्यात असे सुचवण्यात आले होते की तक्रारींचे कमी प्रमाण आणि मौन बाळगल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची संख्या खूप कमी नोंदवली गेली आहे. तथापि, अशा प्रकरणांची प्रत्यक्षात खूप जास्त असू शकते.
सध्या, सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये किमान 17738 नोंदणीकृत मदरसे आहेत आणि त्यातून अंदाजे 22 लाख मुलांना शिक्षण दिले जाते. तथापि, अनेक धार्मिक शाळा औपचारिक देखरेखीशिवाय चालतात.
या संस्थांचे नियमन करण्यासाठी किंवा गैरवापराच्या आरोपांना तोंड देण्यासाठी कोणतेही केंद्रीय प्राधिकरण नाही.