Blaise Metreweli MI6 chief 
आंतरराष्ट्रीय

Blaise Metreweli MI6 chief| MI 6 ला मिळाली खरीखुरी 'एम'; ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखपदी प्रथमच महिलेची निवड

Blaise Metreweli : ब्रिटनची गुप्तहेर संघटना ११५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेच्या नेतृत्वाखाली काम करणार

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Espionage जॉनर च्या चित्रपटाचे किंवा जेम्स बॉण्ड या कॅरॅक्टरच्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला MI6 ही इंग्लंड ची गुप्तहेर संघटना आहे, हे माहिती असेलच. सुरवातीच्या बॉण्डपटांमध्ये जेम्स बॉण्ड चा बॉस हा पुरुष असतो. नंतरच्या काळात ब्रिटनमध्ये जेंव्हा मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्या, तेंव्हा बॉण्डपटांमध्ये जेम्स बॉण्ड ज्या गुप्तहेर संघटनेचा एजंट त्या MI6 ची प्रमुख M ही व्यक्तीरेखा स्त्री पात्र साकारू लागले. त्यानंतरच्या अनेक बॉण्डपटांमध्ये जुडी डेंच या अभिनेत्रीने ती भूमिका गाजवली. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आता पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्षात MI6 या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेचे नेतृत्व खरोखरच एका महिलेकडे आले आहे. या संघटनेच्या 115 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

सीक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस (MI6) ही ब्रिटनची गुप्तहेर संघटना ११५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. सीक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस (MI6) च्या प्रमुखपदी ब्लेझ मेट्रेव्हेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२० पासून MI6 चे नेतृत्त्व रिचर्ड मूर करत होते. आता त्यांच्या जागी मेट्रेव्हेली या ऑक्टोंबरपासून या पदाची सुत्रे हातात घेतील.

ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या कार्यालयाकडून रविवारी (दि.१५) यांची अधिकृत माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली. युनायटेड किंग्डमला शत्रुकडून धोका वाढला आहे. शत्रूंकडून पाण्यातून गुप्तचर जहाजे पाठवली जातात. तर कधी सायबर कट रचून हॅकरकडून सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आणला जातो. त्यामुळे गुप्तचर संघटनेचे काम पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. त्यामुळे ब्लेझ मेट्रेव्हेली यांची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एजन्सीच्या ११५ वर्षाच्या इतिहासातील १८ व्या प्रमुख म्हणून त्या कार्यभार स्वीकारतील, असेही पंतप्रधान केयर स्टारमर यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटिश पंतप्रधानांनी मावळते प्रमुख रिचर्ड मूर यांचेही पत्रकाद्वारे आभार व्यक्त केले, ' मी सर रिचर्ड मूर यांच्या समर्पित सेवेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच ब्लेझ मेट्रेव्हेली या आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करतील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

'M' नव्हे तर 'C' म्हणून ओळखल्या जाणार मेट्रेवेली

इयान फ्लेमिंग लिखित जेम्स बॉण्ड च्या कादंबऱ्यामध्ये MI 6 च्या प्रमुखाला 'M' असे संबोधित केलं आहे तेच चित्रपटमधेही आले आहे. तथापि नवीन प्रमुख मेट्रेवेली यांना 'C' या आद्याक्षराने संबोधित केले जाणार आहे. 47 वर्षीय मेट्रेवेली या सध्या 'MI6' च्या डायरेक्टर जनरल म्हणून काम पाहत होत्या. त्यांना 'Q' म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे technology आणि innovations विभागाची जबाबदारी होती.

कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली ?

ब्लेझ मेट्रेव्हेली यांनी १९९९ मध्ये MI6 मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. फील्ड ऑफिसर म्हणून MI6 मध्ये भरती झाल्या. त्यांनी मध्यपूर्वीतील देश आणि UK मध्ये काम केले आहे. MI5 या देशांतर्गत गुप्तहेर संघटनेतही त्यांनी काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT