Meta You Tube Verdict pudhari
आंतरराष्ट्रीय

Meta You Tube Verdict: तुमचे डिझाईनच तरूणांना व्यसन जडवणारे... न्यायालयाचे मेटाला ४२ लाख तर युट्यूबला १८ लाख डॉलरचा ठोठावला दंड

Anirudha Sankpal

Meta You Tube Verdict: जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मेटा आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस युट्यूब तरूणांच्या आरोग्याला धोका पोहचवत आहे. त्यांचे डिझाईनच व्यसन जडवणारे आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणणारे आहे असे मत न्यायालयानं नोंदवलं. त्यानंतर न्यायालायनं या दोन सोशल मीडिया जायंट्सना मोठा दंड देखील ठोठावला. या केसमुळे आता या सोशल मीडिया कंपन्यांवर युजर्सचे मानसिक आरोग्य धोक्यात घातल्याप्रकरणी अजून केस दाखल होण्याची शक्यता आहे.

एन्झायटी आणि डिप्रेशन

द बेलवेदर केस ही केजीएम नावाच्या २० वर्षाच्या महिलेनं दाखल केली होती. तिनं सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्ट असे तयार केले आहेत की ते सिगारेट सारखे व्यसन जडवणारे आहेत किंवा आपण त्यांना डिजीटल कॅसिनो असं म्हणू शकतो असा आरोप केला होता.

तिनं अमर्याद स्क्रोलिंग आणि अल्गोरिदमिक रेकमेंडेशन या सारख्या फिचर्सचा हवाला दिला. केजीएमने मेटा ज्यांच्याकडे फेसबूक, इन्स्टाग्रामची मालकी आहे आणि गुगल ज्यांच्याकडे युट्यूबची मालकी आहे यांच्यावर केस केली होती. तिनं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे एन्झायटी आणि डिप्रेशन आलं असा आरोप केला होता.

मोठा विजय

केजीएम केस ही फेसबूक, इन्स्टाग्राम, युट्यूब, टिकटॉक आणि स्नॅपचॅटविरूद्ध तरूण मुलांनी शाळांनी आणि प्रशासनानं दाखल केलेल्या हजारो केसेसमधील एक केस होती. केजीएमने केस जिंकल्यामुळं सोशल मीडिया जायंट्सविरूद्ध एक मोठा विजय मानला जात आहे.

या निकालामुळं सोशल मीडिया साईट्स किंवा अॅप या वैयक्तिक हानी निर्माण करतात या थेअरीला आता बळ मिळालं आहे. यामुळं यासारख्या अनेक केसमध्ये आगामी काळात या जायंट कंपन्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे ते आपल्या प्रोडक्टमध्ये बदल करण्याची देखील शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT