Meta file photo
आंतरराष्ट्रीय

Meta: फेसबुक-इन्स्टाग्राम मुलांसाठी घातक? बाल लैंगिक शोषण प्रकरणी मेटाला ३,१०० कोटी रुपयांचा दंड!

न्यायालयाने फेसबुक, इंस्टाग्राममुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल, तसेच मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित धोके लपवल्याबद्दल मेटा कंपनीला दोषी ठरवले आहे.

मोहन कारंडे

मेक्सिको: अमेरिकेतील मेक्सिकोमधील एका न्यायालयाने फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल, तसेच मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित धोके लपवल्याबद्दल मेटा कंपनीला दोषी ठरवले आहे. जवळपास सात आठवडे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी मेटाला ३७५ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे ३,१०० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. हा निकाल जगभरातील टेक कंपन्यांच्या मनमानी कारभारावर चाप लावणारा ठरेल, असे मानले जात आहे.

नफ्यासाठी सुरक्षिततेचा बळी

या प्रकरणाच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मेटाने सुरक्षिततेपेक्षा नफ्याला अधिक प्राधान्य दिले. इंस्टाग्राम आणि फेसबुकची वैशिष्ट्ये जाणीवपूर्वक अशा प्रकारे तयार केली गेली की, मुलांना त्याचे व्यसन लागेल. कंपनीने राज्याच्या 'अनफेअर प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट'चे उल्लंघन केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मुलांच्या निरागसतेचा आणि अननुभवाचा गैरफायदा घेऊन मेटाने 'अनैतिक' व्यापार केल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.

दंडाची रक्कम आणि गुन्ह्याचे स्वरूप

न्यायालयाने मेटाच्या प्लॅटफॉर्मवर हजारो वेळा नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले. प्रत्येक उल्लंघनासाठी जास्तीत जास्त ५,००० डॉलर्सचा दंड आकारण्यात आला असून, एकूण दंडाची रक्कम ३७५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. जरी ही रक्कम वकिलांनी मागितलेल्या रकमेपेक्षा कमी असली, तरी न्यायालयाच्या मते, प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेचे मूल्य सर्वोच्च आहे.

मेटाचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, मेटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर परिश्रम करतो. हानिकारक मजकूर ओळखणे आणि काढून टाकणे हे एक आव्हान असते, पण आम्ही त्यात यशस्वी आहोत," असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. मेटा या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT