Giorgia Meloni daughter File Photo
आंतरराष्ट्रीय

Giorgia Meloni daughter: जी-७ परिषदेत मेलोनींच्या लेकीचीच चर्चा; कॅमेरे पाहताच आईच्या मागे लपली VIDEO

जी-७ शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या महत्त्वाच्या चर्चांपेक्षा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या मुलीची निरागस वागणूक सोशल मीडियावर अधिक चर्चेचा विषय ठरली.

पुढारी वृत्तसेवा

Meloni daughter viral video

जिनिव्हा: जी-७ शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या महत्त्वाच्या चर्चांपेक्षा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या १० वर्षीय मुलीची निरागस वागणूक सोशल मीडियावर अधिक चर्चेचा विषय ठरली. स्वागत समारंभादरम्यान कॅमेऱ्यांच्या झगमगाटापासून दूर राहण्याचा तिचा प्रयत्न अनेकांच्या पसंतीस उतरला.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत त्यांची मुलगी जिनेव्ह्रा जिआम्ब्रुनो जी-७ परिषदेसाठी उपस्थित होती. जागतिक नेत्यांच्या आगमनाचे चित्रीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माध्यम प्रतिनिधी आणि छायाचित्रकार उपस्थित असताना जिनेव्ह्राच्या सहज, बालसुलभ प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्या.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये जिनेव्ह्रा संपूर्ण समारंभात आईच्या जवळच असल्याचे दिसते. माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले जात असल्याने ती काहीशी संकोचलेली दिसली. अनेक प्रसंगी तिने आईचा हात घट्ट पकडून ठेवला होता.

समारंभादरम्यान ती कॅमेऱ्यांकडे थेट पाहणे टाळताना दिसली. तसेच उपस्थित पत्रकार आणि छायाचित्रकारांपासून शक्य तितके दूर राहण्याचाही तिचा प्रयत्न होता. अधिकाऱ्यांशी औपचारिक भेटीगाठी सुरू असताना ती अनेकदा मेलोनी यांच्या मागे उभी राहत होती. कॅमेऱ्यांच्या झगमगाटापासून बचाव करण्यासाठी जणू आईचाच ‘आडोसा’ घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. हे सहज आणि नैसर्गिक क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिच्या वागण्याला निरागस, म्हटले आहे.

फ्रान्सच्या यजमानपदाखाली १५ ते १७ जूनदरम्यान एव्हियान-ले-बॅं येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या सात प्रगत अर्थव्यवस्थांच्या देशांचे नेते सहभागी झाले होते. याशिवाय युरोपियन युनियनचे प्रतिनिधीही परिषदेत उपस्थित होते. जागतिक अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि भू-राजकीय आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद महत्त्वाचे व्यासपीठ मानली जाते. भारतही विशेष आमंत्रित देश म्हणून सहभागी झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT