Massive Fire at Battery Company in South Korea
दक्षिण कोरियामध्ये बॅटरी कंपनीला लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला.  Pudhari News Network
आंतरराष्ट्रीय

दक्षिण कोरिया : बॅटरी कंपनीला भीषण आग; २० जणांचा मृत्यू

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आज (दि.२४) सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांच्या दुजोराने योनहाप वृत्तसंस्थेने दिली आहे.

Summary

  • दक्षिण कोरियातील लिथियम बॅटरी प्लांटला आग

  • बॅटरी सेलच्या स्फोटाने आग लागली

  • स्थानिक माध्यमांनी 20 मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.

सेऊलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग येथील बॅटरी उत्पादक कंपनी एरिसेलमध्ये सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. सुमारे 35 हजार युनिट्स असलेल्या गोदामातील बॅटरी सेलचा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली, असे स्थानिक अग्निशमन अधिकारी किम जिन-यंग यांनी दिली.

योनहॅपने सांगितले आहे की, सुमारे 20 मृतदेह सापडले आहेत, परंतु किमने एका दूरदर्शन ब्रीफिंगमध्ये सांगितले की 9 लोक मरण पावले आणि इतर 4 जखमी झाले. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

SCROLL FOR NEXT