Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक आणि आर्थिक घोटाळ्यांचे आरोप झाल्यावर भारतातून पळून गेलेल्या ललित मोदींना आता ब्रिटनचे नागरिकत्व मिळाली आहे. त्यांनी ऑक्सफोर्ड युनियनमध्ये आपल्या भाषणादरम्यान याची माहिती दिली. ललित मोदी हे अनेक वर्षापासून ब्रिटनला आपलं घर मानत होते. आता नागरिकत्व मिळाल्यानंतर ते ब्रिटनच्या लोकांचे आभार मानू लागले आहेत.
आता ललित मोदी यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतात त्यांच्याविरूद्ध असू असलेल्या तपासांचे काय होणार? आता त्यांना भारतात आणता येणार की नाही याबबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ललित मोदी यांच्यावर आयपीएलमध्ये पैशाची हेराफेरी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना बीसीसीआयमधून सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये भारतातून पळ काढला. त्यांच्याविरूद्ध २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. ते मनी लाँड्रिंग केसमध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेटसमोर उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांच्याविरूद्ध ऑक्शनमध्ये गडबड, मनी लाँड्रींग. एमईएमएचे उल्लंघन असे आरोप आहेत.
बीबीसीच्या एक रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या एक वकिलांनी सांगितलं की आता त्यांना ब्रिटनची नागरिकत्व मिळालं आहे म्हटल्यावर ते पूर्णपणे फ्री झाले. त्यांचे प्रत्यर्पण होणार नाही असं नाहीये. भारत आणि ब्रिटन यांच्यात १९९२ मध्ये प्रत्यर्पण करार झाला होता. त्याच्या अनुच्छेद ४ असं कोणतीही तरतूद नाही ज्या अंतर्गत कोणत्या तरी व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवल्यानंतर त्याला प्रत्यर्पणातून सूट दिली जाऊ शकले. प्रत्यर्पणचा अर्थ हा दुसऱ्या देशातील गुन्ह्याच्या आरोप असलेल्या व्यक्तीला तिथल्या कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत त्या देशाकडे सोपवणे. जेणेकरून तिथं त्याच्यावर केस चालवता येईल.
याचा अर्थ ललित मोदी यांना भारतात आणलं जाऊ शकते. त्यामुळे जरी त्यांना ब्रिटीश नागरिकत्व मिळाले असले तरी भारतासाठी ही काही अडचणीची गोष्ट नाही. त्यामुळं त्यांचे प्रत्यर्पण होऊ शकते.
मात्र ललित मोदी यांना ब्रिटीश नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांना काही सुविधा नक्कीच मिळणार आहेत. त्यांना ब्रिटनच्या काही सुविधा मिळू शकतात. ज्यात पासपोर्ट कायद्याचे संरक्षण या गोष्टींचा समावेश आहे. काही जाणकारांच्या मते ललित मोदी यांना आता ब्रिटनची नागरिकता मिळाल्याने त्यांना भारतात आण्याची शक्यता थोडी कमी होऊ शकते. ब्रिटीश नागरिक असल्याने त्यांना भारतात आणणे अजूनच आव्हानात्मक होऊ शकते. आता ललित मोदी ब्रिटीश नागरिक असल्याने भारताला त्यांना कोणथ्या आरोपांच्या आधारे त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करता येते. ब्रिटन या मागण्या कशा प्रकारे घेते हे पहावे लागेल.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर ब्रिटनची नागरिकता मिळाल्यानंतर ललित मोदी यांना कायदेशीररित्या भारतात आणणे अशक्य होईल असं नाही. मात्र आता प्रक्रिया थोडी अजून कठीण होऊ शकते. भारत आणि ब्रिटन यांच्यामधील प्रत्यर्पण काराराअंतर्गत ब्रिटीश नागरिकांना देखील भारतात पाठवता येऊ शकते.
मात्र आता ललित मोदी हे ब्रिटनचे नागरिक असल्याने त्यांना तिथल्या कायद्याचे पूर्ण संरक्षण मिळणार आहे. त्यांना फक्त इमिग्रेशन नियमांच्या उल्लंघनाच्या आधारावर ब्रिटनच्या बाहेर पाठवता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना ब्रिटीश सरकारकडून सर्व राजनैतिक आणि कायेदीर मदत मिळू शकते.
ललित मोदी यांना आता भारतात आणलं जाऊच शकत नाही असं नाही. मात्र आता काही अडचणी वाढतील केस मजबूत असावी लागेल. आता ते भारतीय नागरिक नाहीयेत. भारता दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था नाही. जर एखादा भारतीय नागरिक आपल्या इच्छेने दुसऱ्या देशाची नागरिकता मिळवतो तर त्याला भारतीय नागरिकता सोडावी लागते.