'विकिलिक्स'च्या असांज यांची ब्रिटिश तुरुंगातून सुटका  file photo
आंतरराष्ट्रीय

'विकिलिक्स'च्या असांज यांची ब्रिटिश तुरुंगातून सुटका

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांची बुधवारी अमेरिकेच्या पॅसिफिक बेटाच्या प्रांतातील सायपन येथील न्यायालयाने सुटका केली. अमेरिकेच्या हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. अमेरिकेशी झालेल्या करारांतर्गत आरोप कबूल करण्याचे मान्य केल्याने पाच वर्षानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांचा मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्युलियन असांज यांना यूएस राष्ट्रीय संरक्षण दस्तऐवज मिळविण्याचा आणि उघड करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. असांजने अमेरिकन कोर्टात लष्करी गुपिते उघड केल्याच्या आरोपासाठी दोषी ठरवण्यास सहमती दर्शवली आहे. त्याबदल्यात त्यांनी सुटकेची मागणी केली. त्यांनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केल्याने वर्षानुवर्षे चाललेले कायदेशीर नाट्य संपुष्टात आले. असांज यांनी सुटका झाल्यानंतर ब्रिटन सोडले असून आज ते अमेरिकेला पोहोचू शकतात.

नेमकं प्रकरण काय?

५२ वर्षीय असांज हे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. २०१० मध्ये अमेरिकन सरकारने इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांशी संबंधित कागदपत्रे लीक केल्याचा आरोप केला होता. असांज यांच्यावर हेरगिरी आणि त्यांच्या वेबसाइटवर यूएस दस्तऐवजांचे प्रकाशन असे १८ आरोप केले होते. त्यांनी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात सात वर्षे आश्रय घेतला. यानंतर त्यांनी गेली पाच वर्षे ब्रिटिश तुरुंगात काढली. याप्रकरणी त्यांना ६२ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. परंतु त्यांनी सुमारे पाच वर्षे म्हणजे ६० महिने ब्रिटिश तुरुंगात घालवले आहेत, त्यामुळे त्यांची शिक्षा पूर्ण मानली जाईल. अशा परिस्थितीत ते ऑस्ट्रेलियाला परत जाऊ शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT