अमेरिकेचे राष्‍ट्रघध्‍यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्‍ट्रघध्‍यक्ष जो बायडेन File Photo
आंतरराष्ट्रीय

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचा पराभव करण्‍यासाठी मीच सर्वोत्तम उमेदवार

पुढारी वृत्तसेवा

यंदाच्‍या अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचा पराभव करण्‍यासाठी मीच सर्वोत्तम उमेदवार आहे, असा विश्‍वास अमेरिकेचे राष्‍ट्रघध्‍यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी व्‍यक्‍त केला आहे. त्‍याचबरोबर आपण अध्‍यक्षपदाच्‍या शर्यतीतून माघार घेणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

ट्रम्‍प यांना पराभूत करण्‍यासाठी वचनबद्ध

जो बायडेन यांनी आपल्‍या डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या सहकार्यांना लिहिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, माध्‍यम व अन्‍य ठिकाणी अशा अटकळ व्‍यक्‍त होत की, मी राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीच्‍या शर्यतीतून बाहेर झालो आहे. मात्र मी रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना पराभूत करण्‍यासाठी वचनबद्ध आहे.

डेमोक्रॅटिक शर्यतीत आपण आघाडीवर

२७ जून रोजी वादविवाद कार्यक्रमानंतर बायडेन यांनी राष्‍ट्राध्‍यक्षाच्‍या शर्यतीतून बाहेर पडावे, असे आवाहन काही पक्ष सहकार्यांनी केले होते. त्‍यामुळे ते निवडणूक लढविणार नाहीत, अशी अटकळ व्‍यक्‍त होत होती. मात्र त्‍यांनी आपल्‍या निवदेनातून स्‍पष्‍ट केले आहे की, मागील दहा दिवसांमध्‍ये मी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि मतदारांशी विस्तृत संभाषण केले आहे. त्यांच्या समर्थनामुळे मी प्रभावित झालो आहे. राष्ट्राध्‍यक्षपदाच्या उमेदवाराच्या डेमोक्रॅटिक शर्यतीत आपण आघाडीवर असल्याचा दावाही त्यांनी केला.

माझ्याकडे जवळपास 3,900 प्रतिनिधी

डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या पाच खासदारांनी जाहीरपणे बायडेन यांनी पुन्हा निवडणुकीत उभे राहू नये, असे आवाहन केले आहे. मात्र बायडेन यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, 14 दशलक्षाहून अधिक मते मिळाली, संपूर्ण नामनिर्देशन प्रक्रियेत 87 टक्के मते. माझ्याकडे जवळपास 3,900 प्रतिनिधी आहेत, ज्यामुळे मला आमच्या पक्षाचा संभाव्य उमेदवार बनवले गेले आहे.

SCROLL FOR NEXT